Tips For Staying Healthy : शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरला आरोग्यदायी जीवनशैलीशी (वेलनेसशी) संबंधित सर्व गोष्टी आवडतात. या छोट्या, पण आरोग्यदायी जीवनशैली जेव्हा सातत्याने अंगीकारल्या जातात, तेव्हा चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि तज्ज्ञही या गोष्टींशी सहमत असतात. कोणताही सराव एका रात्रीत परिणाम देत नाही. पण, काही आठवडे त्याचे पालन केल्यास हळूहळू बदल घडून येऊ शकतो. तर नक्की या आरोग्यदायी जीवनशैली कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेऊयात…
मीरा कपूरने तिच्या कॅप्शनमध्ये रोजच्या आरोग्यदायी जीवनशैलीशी संबंधितशी टॉप १० टिप्स शेअर करून त्यांचा मुद्दा पटवून दिला आहे…
१. त्वचा ही आतल्या शरीराचे प्रतिबिंब आहे. ही स्वतःची तपासणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षण थर मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. तुमच्या चेहऱ्यावर येणारे लहान मुरूमदेखील काही दिवसांपूर्वी शरीरात यकृतात बदल झाल्याचे लक्षण असते. त्याचा परिणाम नंतर त्वचेवर दिसू लागतो.
२. जमेल तसा व्यायाम करा. मीरा कपूर आठवड्यातून पाच वेळा एक तास चालते. पूर्वी तिला स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पिलेट्स करायला खूप आवडायचे; पण पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे तिने ती गोष्ट तिथेच थांबवली. पण, व्यायाम करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत, असे ती आवर्जून म्हणते आहे.
३. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. फक्त खाली बघून स्क्रोल करू नका, तर वर आणि आजूबाजूलाही पाहा.
४. प्रोटीन. @thefunclab चे प्रोटीन अप्रतिम आहे. आठवड्यातून तीनदा संध्याकाळी मीरा कपूर पेय म्हणून घेते. त्याची चव जुन्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या व्हॅनिला मिल्क शेकसारखी लागते.
५. दररोज दुपारच्या जेवणानंतर एक चमचा गुलकंद खा. त्यामुळे पित्त नियंत्रणात राहते. आम्लपित्त आणि मुरमांना बळी पडणाऱ्या उष्ण प्रकृतीला शांतसुद्धा ठेवते.
६. दुपारचे जेवण साधे आणि रात्रीचे जेवण चविष्ट खा. मीरा कपूरची आई किंवा घरातील मंडळी कोकसुद्धा पितात. पण, सगळे संतुलित असले पाहिजे एवढाच त्यामागचा उद्देश असतो.
७. दिवसातून दोनदा नाकात थेंब टाका. मीरा कपूर हे पाठीच्या कण्याच्या दुखापतीसाठी करते. आयुर्वेदानुसार, नाक हे मेंदू आणि मानेच्या कण्याकडे जाणारे प्रवेशद्वार आहे. पारंपरिक ज्ञान ही आजची बुद्धिमत्ता आहे.
८. @dhunwellness मध्ये नेत्र तर्पण करून बघा. जर तुम्ही अजून हा अनुभव घेतला नसेल, तर तो खरोखरच आयुष्य बदलणारा ठरू शकतो. त्यामुळे डोळ्यांची स्पष्टता (vision) तर वाढतेच; पण मनालाही एक वेगळी शांतता आणि भावनांचे ‘विरेचन’ झाल्यासारखेही जाणवते.
९. @dhunwellness येथे रेड लाईट बेडमुळे पेशींची दुरुस्ती, चांगली झोप आणि त्वचा घट्ट होते. त्यासाठी फक्त २० मिनिटे लागतात.
१०. @dhunwellness येथे स्कल्प्ट द लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज. (Lymphatic drainage massage म्हणजे शरीरातील सूज, टॉक्सिन्स कमी करण्यासाठी केलेले मालिश.) मीरा कपूर हे महिन्यातून एकदा करते आणि त्याचे परिणाम लगेचच दिसतात. त्यामुळे चेहरा / शरीर हलके वाटते आणि सूज कमी होते. लिम्फॅटिक सिस्टीमलाही रीसेट करण्याची गरज असते, विशेषतः जास्त प्रवास केल्यावर.
आरोग्याचे आधारस्तंभ : त्वचेची काळजी, आहार आणि आयुर्वेद
याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने काया लिमिटेडच्या पश्चिम विभागाच्या प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉक्टर सुनीता नाईक यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते,
त्वचेची काळजी घेण्याची गुंतागुंतीची पद्धत कधी कधी फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते. त्वचारोगशास्त्रीय दृष्टिकोनातून, जेव्हा त्वचेच्या संरक्षणात्मक थरावर खूप जास्त सक्रिय घटकांचा भार पडत नाही, तेव्हा तो सर्वोत्तम कार्य करतो. त्यात सनस्क्रीन हे त्वचेच्या काळजीसाठी सर्वांत महत्त्वाचे उत्पादन आहे. कारण- ते त्वचेला किरणांमुळे होणारे नुकसान, अकाली वृद्धत्व, पिग्मेंटेशन आणि त्वचेच्या कर्करोगापासूनही वाचवते.
त्यामुळे किमान चार ते सहा आठवडे एक नियमित दिनचर्या पाळणे आणि नवीन उत्पादनांची पॅच-टेस्टिंग करणे यांमुळे व्यक्तींना त्यांच्या त्वचेसाठी खरोखरच फायदेशीर ठरणारी काही मोजकी उत्पादने ओळखण्यास मदत होऊ शकते.
रेड लाईट थेरपी, ज्याला लो-लेव्हल लाइट थेरपी, असेही म्हणतात. पेशींच्या कार्याला चालना देण्यासाठी लाल आणि नियर-इन्फ्रारेड प्रकाशाच्या विशिष्ट तरंगलांबीचा वापर करते. यूव्ही प्रकाशाच्या विपरीत रेड लाईट त्वचेला इजा पोहोचवत नाही. त्याऐवजी त्वचेच्या पृष्ठभागात प्रवेश करून, त्याखालील पेशींना लक्ष्य करतो. त्याउलट लिम्फॅटिक मसाज हे साचलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून किंवा दाह वाढण्यास हातभार लावण्यापासून प्रतिबंध होतो.
लिव्हलाँग येथील पोषणतज्ज्ञ व बीएएमएस पदवीधारक डॉक्टर योगिनी पाटील म्हणाल्या की, आयुर्वेद, ही प्राचीन भारतीय वैद्यक प्रणाली, डोळे निरोगी ठेवण्यासाठी विविध सोपे उपाय सांगते. सर्व ज्ञानेंद्रियांपैकी, डोळ्याला, ज्याला संस्कृतमध्ये नेत्रम् असेही म्हणतात. त्याच्या कार्यामुळे त्याला सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. या आयुर्वेदिक उपचारात, डोळ्यांभोवती पिठाचे वलय बनवून, त्यात कोमट, औषधी तूप ३०-३५ मिनिटे ठेवले जाते. दीर्घकाळ स्क्रीन वापरल्यामुळे कोरड्या आणि थकलेल्या डोळ्यांना पोषण देणे आणि आर्द्रता देणे हा या उपचाराचा उद्देश आहे.
त्याचबरोबर नाकातील थेंब श्वसनमार्गातील अडथळा दूर करण्यास आणि श्वास घेणे सोपे व प्रभावी करण्यास मदत करतात.
आयुर्वेदाचा उद्देश आरोग्याच्या समस्यांवर मुळापासून उपाय करणे हाच असतो. उदाहरणार्थ- गुलकंद. हा गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेपासून बनवलेला एक घट्ट मुरंबा आहे. तो कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून, आम्लपित्त, गॅस्ट्रायटीस, त्वचेची काळजी, अपचन, अल्सर, नाकातून रक्त येणे आणि तणाव यांसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करतो.
कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय, नवी मुंबई येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सल्लागार डॉक्टर दीपक भांगले यांनी सांगितले की, प्रथिनांचे (प्रोटीनचे) सेवन दिवसभर सम प्रमाणात विभागून घेणे, उच्च दर्जाची प्रथिने निवडणे (दूध, अंडी, मासे, चरबीविरहित मांस किंवा प्रथिनांचे पूरक वनस्पतीजन्य स्रोत) आणि याला ‘रेझिस्टन्स ट्रेनिंग’ (स्नायू बळकट करणारे व्यायाम) व योग्य विश्रांतीची जोड देणे यांमुळे आहार संतुलित बनू शकतो.
