अॅमेझॉनवर मोबाईल ‘मॅड डील’: वनप्लसपासून एमआय आणि सॅमसंगपर्यंत, उत्तम ऑफर!

२५ ऑक्टोबरपर्यंत काही बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत, तर पहिल्या ऑर्डरवर डिलिव्हरी फ्री मिळू शकते.

lifestyle
आयफोन ११ हा फोन तुम्ही ३९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. (photo: प्रतिनिधिक)

जर तुम्हाला धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या आधी नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी असू शकते. ई-कॉमर्स शॉपिंग साइट अमेझॉन सध्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचा भाग म्हणून एक्स्ट्रा हॅपीनेस डेज चालवत आहे. या काळात मोबाईलवर ‘मॅड’ टॅग अंतर्गत आश्चर्यकारक डिल्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुम्ही ४० हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. शिवाय तुम्हाला २० पेक्षा जास्त आकर्षक भेटवस्तू मिळू शकतात. चला यापैकी काही डिल्सवर एक नजर टाकूया

या स्मार्टफोनवर मिळणार सवलत

७४,९९९ रुपयांच्या MRP असलेल्या Samsung S20FE ची सवलत (बँक ऑफरसह) ३७,२४० रुपये असू शकते. तर Mi 11X 5G आणि ८ जिबी +१२८ जिबी असलेला या स्मार्टफोनची किंमत (MRP) ३४,९९९ रुपये असून हा फोन २२,९९९ रुपयांच्या सूटसह तुम्हाला घेता येईल. याच बरोबर या मॅड डीलमध्ये तुम्हाला ६४,९९९ रुपयांच्या MRP सह असलेला One Plus 9 Pro ५७,९९९ रुपयांच्या सवलतीने मिळू शकतो.

२३,९९० रुपयांच्या MRP सह असलेला Samsung M32 5G १५,७४९ रुपयांमध्ये मिळू शकतो. IQOO Z3 या फोनची किंमत या डीलमध्ये १६,४९० रुपये आहे, तर त्याची MRP किंमत २४,९९० रुपये आहे. तसेच सॅमसंग गॅलेक्सी M52 5G या स्मार्टफोनची किंमत २३,७४९ रुपये आहे, तर त्याची MRP किंमत ३४,९९९ रुपये आहे.

मॅड डील अंतर्गत अॅपलचे आयफोन ११ हा फोन तुम्ही ३९,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते, तर त्याची MRP ४९,९०० रुपये आहे. रेडमी नोट१०S हा फोन १२,७४९ रुपयांना उपलब्ध होईल, तर या फोनची MRP किंमत १६,९९९ रुपये आहे. रेडमी ९ अॅक्टिव (Redmi 9 Active) ची MRP किंमत ९,४९९ रुपये आहे, पण तुम्ही हा फोन या डील मध्ये ७,६५० रुपयांना मिळवू शकता. दुसरीकडे, वनप्लसचा नॉर्ड सीई या फोनची किंमत २४,९९९ रुपये आहे, तर तुम्ही हा फोन २२,९९९ रुपयांमध्ये मिळू शकता.

मॅड डील च्या या खास ऑफर

सध्या अॅमेझॉनवर मोबाईल प्रोडक्टवर ४० टक्के सूट देण्यात येत आहे. या सूट व्यतिरिक्त, तुम्ही नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर, कूपन्सचा लाभ घेऊ शकता. एवढेच नाही तर २५ ऑक्टोबरपर्यंत काही बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत, तर पहिल्या ऑर्डरवर डिलिव्हरी फ्री मिळू शकते.

स्मार्टफोनची विक्री Q3 मध्ये 5 टक्क्यांनी कमी होऊन 4.75 दशलक्ष युनिट झाली

३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत देशातील स्मार्टफोनची विक्री वार्षिक ५ टक्क्यांनी घटून ४.७५ दशलक्ष युनिट्सवर आली आहे. ही माहिती देताना रिसर्च कंपनी कॅनालिसने सांगितले की, स्मार्टफोनच्या विक्रीतील घट हे स्वस्त स्मार्टफोन मॉडेल्सच्या पुरवठ्यातील अडचणींमुळे होत आहे.
एप्रिल-जून २०२१ तिमाहीच्या तुलनेत ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत स्मार्टफोन विक्री ४७ टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. याचे मुख्य कारण कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेनंतर मागणी आली. तिमाहीत शाओमीने सर्वाधिक १.१२ युनिट विकले जे एकूण स्मार्टफोन विक्रीच्या २४ टक्के आहे. यानंतर सॅमसंगने ९१ लाख युनिट्स विकल्या आणि त्याचा वाटा १९ टक्के होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mobile mad deals on amazon from oneplus to mi and samsung you can save up to 40 thousand rupees scsm

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!