scorecardresearch

मोमोज खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा Momos खावे

Momos Side Effect: मोमोज खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि स्वादुपिंडासाठी ते खूप धोकादायक ठरू शकते.

मोमोज खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा Momos खावे
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Momos Side Effect: आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या सवयींमध्येही बदल झाला आहे. फास्ट फूड हा लोकांच्या दैनंदिन सवयीचा भाग बनला आहे कारण बहुतेक वेळ कामाच्या निमित्ताने घराबाहेर घालवला जातो. त्यामुळे अनेकजण पिझ्झा, बर्गर, नूडल्स, अशा अनेक खाद्यपदार्थांचा आग्रह धरतात. हल्लीच फास्ट फूडच्या यादीत मोमोजचा समावेश झाला असून तो अनेकांचा आवडता पदार्थ बनला आहे. पण हे मोमोज खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया..

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोमोज खायला आवडतात. पण तेच मोमोज तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. फक्त मोमोजच नाही तर त्यासोबत येणारी चटणीही आपल्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते.

कोलेस्ट्रॉल वाढू शकते..

मोमोज बनवण्यासाठी मैदा वापरला जातो. मोमोजच्या पीठात भरपूर स्टार्च वापरला जातो जेणेकरून ते खायला मऊ होईल. पण या स्टार्चमुळे पोटाचा घेर वाढण्याची दाट शक्यता असते. यासोबतच मोमोज खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल वाढते. ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते.

स्वादुपिंडासाठी हानिकारक..

मोमोज मऊ करण्यासाठी, त्याच्या पिठात अॅझोडीकार्बोनमाइड आणि बेझॉयल पेरोक्साइड वापरतात. हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. हे तुमच्या स्वादुपिंडासाठी खूप हानिकारक आहेत.

अनहेल्दी पदार्थांचे सेवन..

मोमोजमध्ये भाज्या आणि चिकन वापरले जाते. यावेळी ते मोमो जास्त वेळ ठेवल्यास खराब होऊ शकतात. त्याच्या सेवनाने तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते. चिकनमध्ये असलेले इकोली बॅक्टेरिया आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात.

( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील शेवटचा रस्ता, जिथे लोकांना एकट्याने जाण्यास परवानगी नाही)

तिखट चटणी आरोग्यासाठी हानिकारक आहे

अनेकांना मोमोसोबत तिखट चटणी खायला आवडते. पण ही तिखट चटणी तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूळव्याध होऊ शकतो. हेल्थ लाइननुसार, लाल तिखटमुळे मूळव्याध होऊ शकतो.

मधुमेहाचा धोका वाढवू शकतो

मोमोमध्ये वापरण्यात येणारे एजोडाइकार्बोनामाइड आणि बेझॉयल पेरोक्साइड आपल्या शरीराच्या स्वादुपिंडाला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे इन्सुलिन हार्मोनचा स्राव योग्य प्रकारे होत नाही. यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. जास्त मोमोज खाल्ल्याने मधुमेहाचा धोका जास्त पटीने वाढतो.

मोमोज किती खावेत?

जर तुम्ही तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबरयुक्त अन्न घेत असाल तर तुम्ही अधूनमधून जंक फूड खाऊ शकता, परंतु जर तुम्ही आठवड्यातून किमान ३ वेळा मोमोज खात असाल तर ते लगेच बंद करावे. जर तुम्हाला मोमोज खायचे असतील तर ते घरीच बनवा आणि मैद्याऐवजी गव्हाचे पीठ आणि ताज्या भाज्या वापरा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 14:45 IST

संबंधित बातम्या