Moneypox New Symptoms: जगभरातील शेकडो देशांमध्ये मंकीपॉक्सचे ३५ हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. भारतातही मंकीपॉक्सचा धोका अद्याप निवळलेला नाही. आतापर्यंत जे १० रुग्ण आढळून आले होते त्यांच्यात काही विशिष्ट लक्षणे दिसून आली आहेत. आतापर्यंत मंकीपॉक्सची केवळ दोन लक्षणे आपल्याला ठाऊक होती ती म्हणजे अंगावर जाडसर फोड येणे आणि ताप चढणे. मात्र सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये हृदय व मेंदूशी संबंधित काही लक्षणे दिसून आली आहेत. अनेक मानसिक आजार व न्यूरॉलॉजिकल समस्यांमागे मंकीपॉक्स हे कारण असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडनच्या क्वीन्स मेरी विद्यापीठातील डॉ. जेम्स ब्रांटन बेडनोच यांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स रुग्णांमध्ये न्यूरॉलॉजिकल व मनोवैज्ञानिक समस्या दिसून आल्या आहेत. जेम्स ब्रांटन म्हणतात की, मंकीपॉक्समुळे त्वचेवर फोड व ताप येणे ही वरून ओळखता येणारी लक्षणे आहेत मात्र यामुळे मानसिक समस्या मेंदूच्या क्रियांमध्ये अडथळा असाही त्रास होऊ शकतो.

वास्तविक यापूर्वी स्मॉल पॉक्स म्हणजेच कांजण्या आजारामुळे न्यूरॉलॉजिकल समस्या होत असल्याचे संशोधन समोर आले होते त्यावरूनच आता मंकीपॉक्समुळेही हा धोका असण्याची शक्यता अभ्यासकांना वाटत होती यावर काही रुग्णांचे निरीक्षण केल्यावर २ ते ३ टक्के मंकीपॉक्स रुग्णांमध्ये अशाच समस्या दिसून आल्या.

कपाळावर सूज

संशोधकांच्या माहितीनुसार, काही व्यक्तींमध्ये एन्सेफलाइटिस म्हणजेच डोक्याला विशेषतः कपाळावर गंभीर सूज दिसून येते, यामुले दीर्घकालीन अपंगतव येण्याचा सुद्धा धोका असतो. एन्सेफलाइटिस मुळे मेंदूचे कार्य नीट होऊ शकता नाही. केवळ सूजच नव्हे तर सतत डोकेदुखी, थकवा आणि धडधड वाढण्यासारखी अनेक लक्षणेही मंकीपॉक्स रुग्णांमध्ये दिसून आली आहे. याशिवाय सतत अस्वस्थ वाटणे व चिंता वाढणे असे त्रासही या रुग्णांमध्ये उद्भवतात.

हृदयाच्या विकाराची लक्षणे

मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये हृदयाचे विकार जसे की मायोकार्डिटिसचे ही लक्षण दिसून येत आहे. मायोकार्डिटिसमुळे हृदयाच्या वाहिन्यांना सूज येऊ शकते परिणामी धडधड अनियमित होऊ शकते. यामुळे अचानक हृदय बंद पडण्याचा धोका असतो.

मायोकार्डिटिस म्हणजे काय?

हृदयाच्या मांसपेशींना मायोकार्डियम असे म्हणजे, मायोकार्डिटिस मुळे हृदयजवळील विद्युत प्रणाली प्रभावित होऊ शकतो. यामुळे रक्त क्षमता कमी होऊन हृदयाची धाधाड अनियमित होते व परिणामी कालांतराने हृदय कमकुवत होते. यामुळे शरीराच्या रक्ताभिसरण कार्यातही अडथळा येत असल्याने इतर अवयवांवर प्रभाव दिसून येतो. यामुळे रक्ताच्या गाठी तयार होणे व त्यातून हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो.

Lumpy Skin Disease: लम्पी त्वचा रोग माणसांना होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे व उपाय

दरम्यान, जेम्स ब्रांटन म्हणतात की, सध्याच्या निरीक्षणानुसार संबंधित लक्षणे ही अगदी मोजक्या रुग्णांमध्ये दिसून आली असली तरी याचा धोका गंभीर असू शकतो. याशिवाय डोकेदुखी किंवा स्नायुदुखी तसेच सततचा थकवा सुद्धा दुर्लक्षित करू नये.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moneypox new symptoms heart and brain to be affected scientist have discovered neurological mental issues svs
First published on: 07-10-2022 at 15:22 IST