Monsoon Health Tips : पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन ठरू शकते नुकसानदायक; जाणून घ्या कारणे

सामान्यतः आपण आरोग्यदायी आहारात दूध आणि दह्याचा समावेश करतो, पण पावसाळ्यात त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

Consumption of dairy products in rainy season can be harmful
पावसाळ्यात दूध आणि दही कमी का खावे? (Photo : Pexels)

संपूर्ण भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. उन्हाळ्याच्या गरमीमुळे हैराण झालेल्यांना आता दिसला मिळाला आहे. परंतु पावसाळ्यामध्ये आजार आणि संसर्गाचा धोका निर्माण होतो. यामध्ये पोटासंबंधीच्या तक्रारींचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे या ऋतूत आपल्या आहारात बदल करणे आवश्यक ठरते. यावेळी आपण आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करावा, तर काही पदार्थ कटाक्षाने टाळावेत. सामान्यतः आपण आरोग्यदायी आहारात दूध आणि दह्याचा समावेश करतो, पण पावसाळ्यात त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

पावसाळ्यात दूध आणि दही कमी का खावे?

जीआयएमएस हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी पावसाळ्यात आपण दूध आणि दह्याचे सेवन मर्यादित का केले पाहिजे, याची काही करणे सांगितली आहेत. जाणून घेऊया ही कारणे.

Monsoon Health Tips : पावसाळ्यात मांसाहारापासून राहा लांब; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

  • जंतूंचा फैलाव

पावसाळ्यात हिरवळ वाढते आणि हिरव्या गवतासोबत असे अनेक तण वाढू लागतात ज्यात कीटक-किडेही वाढतात. गाई, म्हशी, शेळ्या हे तण चारा म्हणून खातात. याचा परिणाम असा होतो की हे जंतू गवतातून दूध देणाऱ्या जनावरांच्या पोटात पोहोचतात. अशावेळी त्यांनी दिलेल्या दुधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते. त्यामुळे या काळात पावसाळा संपण्याची वाट पाहणे आणि दुग्धजन्य पदार्थापासून काही अंतर राखणे चांगले आहे.

  • पचन समस्या

पावसाळ्यात अनेकदा लोकांची पचनशक्ती चांगली नसते. अशा स्थितीत जर तुम्ही जास्त फॅटयुक्त दुधाचे सेवन केले तर पचनात समस्या निर्माण होतात आणि पोटदुखी, गॅस, जुलाब, उलट्या अशा तक्रारी सुरु होतात. त्यामुळे या काळात या गोष्टींपासून दूर राहावे.

Photos : जास्त टोमॅटो खाल्ल्यानेही शरीराला होऊ शकते नुकसान; खाण्याच्या आधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

  • सर्दी-तापाचा धोका

कडक उन्हात, अधिकाधिक दही खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते पोट थंड ठेवते आणि पचनाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. पण पावसाळ्यात वातावरण थंड होते आणि अशा परिस्थितीत थंड पदार्थ जास्त खाल्ले तर सर्दी-तापाचा धोका निश्चितच असतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Monsoon health tips consumption of dairy products in rainy season can be harmful pvp

Next Story
आरोग्यवार्ता : दिव्याच्या प्रकाशात झोपण्याने विकारांची शक्यता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी