Monsoon Home Decor Wooden Furniture Care Tips Rainy Season : फर्निचर हा आपल्या सर्वांच्या घरांतील एक महत्त्वाचा भाग आहे आणि आपण सर्व जण आपल्या घरात अनेक प्रकारचे फर्निचर वापरतो. यामध्ये लाकडी फर्निचर वापरणे अगदी सामान्य आहे. लाकडी फर्निचर अतिशय दर्जेदार दिसते, पण त्याची योग्य देखभाल आवश्यक आहे. विशेषत: पावसाळ्यात लाकडी फर्निचरची चमक टिकवून ठेवणे फार कठीण काम असते. कारण पावसाळ्यात ओलाव्यामुळे लाकडी फर्निचरला काळी, पांढरी बुरशी लागते; ज्यामुळे महागडे फर्निचर खराब दिसू लागते. अशावेळी फर्निचरवरील बुरशी, डाग साफ करताना काही गोष्टी टाळणे फार गरजेचे असते, अन्यथा फर्निचर खराब होण्याचे टेन्शन असते.

पावसाळ्यात लाकडी फर्निचरची काळजी कशी घ्यावी? (Tips to Maintain Wooden Furniture This Monsoon)

पावसात ओल्यामुळे लाकडी फर्निचरवर काळी-पांढरी बुरशी पकडते. याशिवाय अनेकदा अन्न, शाई, तेल इत्यादींचे डाग पडतात. पण, बुरशी आणि डाग सहजासहजी साफ करता येत नाही. साधारणपणे असे दिसून येते की, आपण लाकडी फर्निचर साफ करतो, पण डाग साफ करताना काही चुका होतात; त्यामुळे फर्निचरचे मोठे नुकसान होते. त्यामुळे आज आपण लाकडी फर्निचरवरील बुरशी, डाग साफ करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे जाणून घेऊ..

Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
risk of cancer from bakery products marathi news
बेकरीजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका; भंगारातील फर्निचरमधून उत्सर्जित होणारी रसायने आणि वायू हानिकारक
benefits of alu during monsoon season
Health Special: पावसाळ्यातला अळू किती पोषक?
boiled water during monsoon
Health Special: पावसाळ्यात कढवून आटवलेले पाणीच का प्यावे?

१) हार्श केमिकल वापरणे

जेव्हा लाकडी फर्निचरवर बुरशी, डाग पडतात तेव्हा ते लवकर आणि सहज काढण्यासाठी आपण सर्व जण ब्लीच, अमोनिया किंवा इतर हार्श केमिकल वापरतो; यामुळे लाकडी फर्निचरचे नुकसान होऊ शकते आणि त्याची चमक जाऊ शकते. म्हणून, लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी नेहमी सौम्य साबण आणि किंचित पाणी वापरा. हट्टी डाग काढण्यासाठी लाकडी फर्निचरसाठी डिझाइन केलेले विशेष क्लिनर वापरा.

More Stories On Lifestyle News : आरशात पाहून बोलल्याने तुमचा आत्मविश्वास वाढण्यासह होतात ‘हे’ ३ फायदे

२) जोरजोरात स्क्रबिंग करणे (Monsoon Home Decor)

लाकडी फर्निचरवरील डाग, बुरशी सहजपणे निघत नाही, तेव्हा ते साफ करण्यासाठी काही जण त्यावर जोरजोरात स्क्रबिंग करतात. असे केल्याने लाकडी फर्निचरची चमक कमी होते किंवा स्क्रॅच पडतात. म्हणून फर्निचरवरील डाग काढण्यासाठी मऊ, मुलायम कापडाचा वापर करा. डाग नेहमी हलक्या हाताने घासून काढा. हट्टी डाग साफ करण्यासाठी मऊ-ब्रिस्टल ब्रश वापरा.

आजकाल बाजारात विविध प्रकारचे क्लिनर उपलब्ध आहेत, जे साफसफाईचे काम सोपे करतात. परंतु, काहीवेळा ते काही लाकडी फर्निचरच्या सरफेसचे नुकसानदेखील करू शकतात. त्यामुळे लाकडी फर्निचरवर कोणताही नवीन क्लिनर वापरणे कधीही टाळा. यामुळे फर्निचर खराब होऊ शकते किंवा त्याचा रंगही खराब होऊ शकतो. कोणतेही क्लिनिंग प्रोडक्ट वापरताना ते नेहमी फर्निचरच्या एका छोट्या पॅचवर लावून पाहा, यामुळे फर्निचरची फिनिशिंग खराब तर होत नाही ना हे समजेल.

३) फर्निचर ओल्या कपड्याने साफ करू नका (Home furniture care monsoon)

लाकडी फर्निचरवरील बुरशी, डाग साफ करताना ओला कपडा वापरणे टाळा. यामुळे लाकडात जास्त पाणी शिरू शकते, ज्यामुळे ते फुगू शकते, रंग बदलू शकतो किंवा त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळे लाकडी फर्निचरवर कधीही जास्त पाणी टाकू नका किंवा खूप ओले कापड वापरू नका. नेहमी सुक्या कापडाच्या साहाय्याने फर्निचर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. तसेच साफसफाई केल्यानंतर लगेच कोरड्या कापडाने सरफेस कोरडे करा.