Monsoon Cleaning Tips: पावसाळा उन्हापासून दिलासा देत अशला तरी तो आपल्यासोबत अनेक समस्याही घएऊन येतो. पावसाचे पाणी, आर्द्रता आणि पाणी साचल्यामुळे डास, बुरशी, जीवाणू आणि इतर जंतूंच्या प्रजननासाठी पोषक वातावरण तयार होते. या ऋतूमध्ये काही गोष्टींकडे विशेष लक्षण देणे आवश्यक असते. घरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे ओलावा साचतो. त्यामुळे जीवाणू आणि बुरशीची झपाट्याने वाढ होते. जर ही ठिकाणे नियमितपणे स्वच्छ केली नाहीत, तर अॅलर्जी, सर्दी, त्वचेचे संक्रमण, पोटाचे विकार आणि श्वसनाचे त्रास होऊ शक्तात.
आपल्या घरात रोजच्या वापरातील अशा अनेक वस्तू असतात, ज्यांना आपण दिवसभरात अनेकदा स्पर्ष करतो. तरीही आपण त्यांच्या स्वच्छतेकडेअनेकदा दुर्लक्ष करतो. पावसाळ्यात काही वस्तू जंतूंच्या वाढीचे केंद्र बनू शकतात आणि त्यातून संसर्गही पसरू शकतो. त्यामुळे या वस्तू नियमितपणे स्वच्छ करणे आणि त्या कोरड्या ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
किचनमधील सिंक आणि ड्रेन
पावसाळ्यात किचनमधील सिंक हे सर्वात घाणेरड्या ठिकाणांपैकी एक असते. अन्नाचे लहान कण आणि सततच्या ओलाव्यामुळे जिवाणूंची झपाट्याने वाढ होते.
यासाठी दररोज रात्री ड्रेनेज पाईपमध्ये गरम पाणी ओता. आठवड्यातून २ ते ३ वेळा बेकिंग सोडा आणि व्हिनेगरने ते स्वच्छ करू शकता. याव्यतिरिक्त सिंक जंतुनाशकाने स्वच्छ करा आणि ड्रेन तुंबण्यापासून रोखा.
स्वयंपाकघरातील स्पंज
भांडी घासण्यासाठी स्पंजचा नियमितपणे वापर केला जातो. कालांतराने त्यात अन्नाचे कण आणि ओलावा अडकून राहतो, त्यामुळे त्यावर जिवाणू आणि बुरशीची वाढ होण्याची शक्यता वाढते.
यासाठी वापरल्यानंतर स्पंज पूर्णपणे पिळून घ्या. तसंच आठवड्यातून एकदा तो ५ मिनिटांसाठी उकळत्या पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे तो बऱ्यापैकी स्वच्छ होऊ शकतो.
रिमोट, दरवाजाचे लॅच आणि स्विच बोर्ड
प्रत्येक घरात रिमोट, दाराची कडी आणि स्विचबोर्ड यांचा वापर दिवसातून अनेक वेळा केला जातो. घरातील कोणाला सर्दी किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला असल्यास या वस्तूंमुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांना नियमितपणे स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यासाठी ते स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरण्याची शिफारस केली जाते. मायक्रोफायबर कापडावर जंतुनाशक लावता येते. मात्र इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर थेट फवारणी करणे टाळा.
पायपुसणी किंवा कार्पेट
पावसाळ्यात पायपुसण्यांवर आणि कार्पेटवर अनेकदा धूळ आणि घाणेरडे पाणी साचते. ते ओले राहिल्यामुळे त्यांच्यावर जिवाणू आणि बुरशीची वेगाने वाढ होण्याची शक्यता असते.
यावर उपाय म्हणजे ही पायपुसणी उन्हात वाळवा. तसंच त्या आठवड्यातून किमान एकदा धुवा. कार्पेट असल्यास नियमितपणे त्याची नीट स्वच्छता ठेवा. तसंच आठवड्यातून एकदा त्यांनी ब्रश करा आणि उन्हात ठेवा.
पाण्याची बाटली आणि झाकणं
जवळपास प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्यासाठी बाटल्या वापरल्या जातात. त्यामुळे झाकणाला वारंवार स्पर्ष केल्याने आणि वेगवेगळ्या लोकांकडून वापरल्याने संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. यासाठी तुम्ही वापरत असलेली पाण्याची बाटली नियमितपणे ब्रशने स्वच्छ करा. याव्यतिरिक्त तुम्ही आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात डिशवॉशिंग लिक्विड मिसळूनही ती स्वच्छ करू शकता.
