Monsoon Clothes Drying Tips : पावसाळा उन्हापासून दिलासा देत असला तरी, या काळात कपडे वाळवण्याची एक मोठी समस्या निर्माण होते. सूर्यप्रकाश नसल्याने आणि हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे कपडे हळू वाळतात, ज्यामुळे त्यांना कुबट वास येतो. पुन्हा नीट धुतल्यानंतरही कपड्यांना येणारा वास काही केल्या जात नाही. जर तुम्ही या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही ५ रुपयांची वस्तू वापरून ही समस्या सोडवू शकता.

बादलीत तुरटी टाका

पावसाळ्यात कपड्यांमधील दुर्गंधी घालवण्यासाठी तुरटीचा वापर करता येतो. तुरटी बाजारात फक्त ५ रुपयांना सहज मिळते. तुरटीमध्ये असे गुणधर्म आहेत जे दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू कमी करण्यास मदत करतात. कपडे धुतल्यानंतर, ते स्वच्छ पाण्याने धुण्यापूर्वी बादलीत तुरटीचा एक छोटा तुकडा किंवा थोडी तुरटीची पावडर टाका. कपडे १० ते १५ मिनिटे पाण्यात तसेच ठेवा. त्यानंतर ते वाळवा.

तुरटीपासून फायदा कसा मिळवावा?

तुरटीच्या पाण्यात कपडे भिजवल्याने ओलाव्यामुळे येणारी दुर्गंधी कमी होऊन ते ताजे राहतात. हे विशेषतः टॉवेल, व्यायामाचे कपडे, मोजे आणि रोजच्या वापरातील कपड्यांसाठी प्रभावी ठरू शकते.

‘या’ गोष्टींची घ्या काळजी

  • कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये जास्त वेळ ठेवू नका.
  • घरातील हवेशीर ठिकाणी कपडे वाळवा.
  • ओले कपडे एकावर एक ठेवू नका.
  • कपडे कपाटात ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा.
  • कपडे धुताना तुम्ही लॅव्हेंडर किंवा लिंबाच्या इसेन्शियल ऑइलचे काही थेंब देखील घालू शकता.