Monsoon Centipede Remedies : पावसाळ्यात घरांमध्ये गोम दिसणे सामान्य आहे. सततचा ओलावा, दमटपणा आणि काळोख्या भागात त्या घर करुन राहतात. गोम लहान कीटक खाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करत असली तरी, जर ती बाथरुममधून बाहेर येत स्वयंपाकघर किंवा बेडरूममध्ये शिरली तर त्रासदायक ठरू शकते.

पावसाळ्यात बाथरुमच्या पाईपमधून गोम घरात शिरतात. ज्या लहान मुलांना चावण्याची किंवा त्यांच्या कानात शिरण्याची भीती असते. जर तुमच्या घरातही पावसाळ्यात गोम येण्याचे प्रमाण अधिक असेल तर तुम्ही कोणत्याही घातक केमिकलचा वापर न करता त्यांना काही सोपे उपाय करुन घरापासून दूर ठेवू शकता, हे सोपे उपाय कोणते जाणून घेऊ…

पावसाळ्यात गोम येण्याचे प्रमाण का वाढते?

पावसाळ्यात घरांमध्ये आर्द्रता आणि ओलावा वाढतो. गोम ओलसर आणि थंड जागा शोधून घरात शिरते आणि नंतर बाथरुम, स्वयंपाकघर आणि भिंतींच्या फटींमध्ये आपलं घर करते.

गोम पुन्हा घरात दिसणार नाही, करा ‘हे’ उपाय

घरातील भेगा आणि कोपऱ्यांमध्ये मीठ शिंपडल्याने ओलावा कमी होतो. कापूर किंवा कडुलिंबाच्या तेलाचा तीव्र वास देखील गोम दूर ठेवण्यास मदत करू शकतो. व्हिनेगर आणि लिंबाचे मिश्रण फवारल्यानेही त्यांना दूर ठेवण्यास मदत होईल.

घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या

गोम घरापासून दूर ठेवण्यासाठी घरातील फरशी आणि इतर भाग कोरडा आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाथरूम आणि स्वयंपाकघरात पाणी साचू देऊ नका, भिंतींमधील भेगा बुजवा आणि नियमितपणे फरशी पुसा. यामुळे त्यांच्या लपण्याच्या जागा कमी होतात.

गोम चावल्यास काय करावे

गोम चावल्याने सहसा जीव जात नाही, परंतु त्यामुळे वेदना, सूज किंवा ऍलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते. अशा परिस्थितीत, बाधित भाग साबण आणि पाण्याने पूर्णपणे धुवा. जर वेदना, सूज किंवा ऍलर्जी अधिक वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.