बरेच लोक ऍसिडिटी आणि पोटात गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत, आजकालच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हे होतं. यासाठी आपल्याला काही सवयी बदलाव्या लागतील ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते आणि अ‍ॅसिडिटीचे मोठे कारण ठरते.

सकाळी अशी चूक करू नका
जर तुम्ही चहाचे शौकीन असाल आणि सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला आवडत असेल, तर त्यामुळे अ‍ॅसिडिटी आणि रिफ्लक्सची समस्या उद्भवते. कदाचित तुम्हाला माहित नसेल की रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पित्ताच्या रसावर नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे अ‍ॅसिडिटीबरोबरच पोटात मळमळण्याच्या तक्रारीही सुरु होतात.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

आणखी वाचा : स्वप्नात वारंवार साप दिसणे काय सूचित करते, जाणून घ्या

या गोष्टींपासूनही लांब रहा
फक्त चहाच नाही तर असे अनेक पदार्थ आहेत जे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. यामध्ये मसालेदार गोष्टी, गरम कॉफी, जास्त तेल असलेले अन्न, चॉकलेट इ. या गोष्टींपासून दूर राहणे चांगले.

आणखी वाचा : बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूचे आलिशान घर पाहिलेत का?

अॅसिडिटी टाळण्यासाठी रोज सकाळी काय करावे?
१. जर तुम्हाला सकाळी चहाशिवाय राहणे शक्य नसेल तर तुम्ही चहामध्ये आले मिसळून पिऊ शकता. त्यामुळे अ‍ॅसिडिटीची शक्यता कमी होईल.
२. सकाळी लवकर नाश्त्यामध्ये ओटमीलचा समावेश करा, त्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि पचनक्रियाही चांगली राहते.
३. सकाळी उकडलेले अंडे खाल्ल्यास पोटाचा त्रास होत नाही.
४. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, त्यामुळे तुम्ही त्या रोज सकाळी खाऊ शकता, तरी आम्लपित्त टाळण्यासाठी त्या जास्त तेलात शिजवू नका.
५. जेवल्यानंतर सकाळी फिरायला जा, त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा धोका कमी होतो.