अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, दिवसाची सुरुवात चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो. दिवसाची सुरुवात कशी होते याचा पूर्ण दिवसावर प्रभाव पडत असतो. आपल्या सकाळच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास आपण आपला मूड रिफ्रेश करुन आपला दिवस चांगला घालवू शकतो. सकाळी उठल्यावर शरीर निरोगी आणि दिवसभराचे काम करण्यासाठी उत्साही राहण्याकरता तुम्ही अनेक गोष्टी करत असता. परंतु शरीर स्वास्थाकडे लक्ष देत असताना आपण अनेकदा आपल्या त्वचेची देखभाल करणं विसरतो. जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने, हसत आणि सकारात्मकपणे करायची असेल तर सकाळी काही गोष्टींचा तुमच्या रुटीनमध्ये समावेश करा.

त्वचा हायड्रेट ठेवा

आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी द्रव पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं गरजेचं आहे. शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स केल्यास त्वचेवर चमक येण्यास मदत मिळते. यासाठी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून देखील पिऊ शकता तसेच सकाळी नारळ पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.​त्वचा हायड्रेट ठेवा : आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी द्रव पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं गरजेचं आहे. शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स केल्यास त्वचेवर चमक येण्यास मदत मिळते. यासाठी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून देखील पिऊ शकता तसेच सकाळी नारळ पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
diy best safe summer travel tips and tricks health tips for summer vacation
उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग जाताना ‘या’ चार गोष्टी आठवणीने बरोबर घ्या
Health Special
Health Special: उन्हाळ्याची झळ – काय काळजी घ्याल ?
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

फेसपॅक

मुलतानी मातीचे त्वचेसाठी भरपूर फायदे आहेत. तेव्हा सकाळच्या सुमारास चेहरा स्वच्छ धुऊन त्याच्यावर मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. मुलतानी मातीतील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील सर्व प्रकारची घाण, धूळ, मातीचे कण स्वच्छ होण्यास मदत मिळेल. मुलतानी मातीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स देखील कमी होऊन चेहरा अधिक चमकदार होण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही होममेड फेसपॅक देखील वापरू शकता.

सकाळी उठल्यानंतर डोळे नीट धुवा

तुम्हाला कोणतीही ऍलर्जी किंवा इतर समस्याने पापण्या एकमेकांना चिकटतात अशात स्वच्छ सूती कापडाने किंवा कोमट पाण्यात भिजवलेल्या सुती कापडाने डोळ्यांवर फिरवत हलक्या हाताने चिपड काढा.

हेही वाचा – Eye Care Tips : पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर…

सोपा मेकअप

जर तुम्हाला मुरुम, बारीक रेषा किंवा डार्क सर्कल लपवायची असतील तर कन्सीलर वापरा. पण नेहमी त्वचेचा टोन लक्षात घेऊन कन्सीलर वापरा. कन्सीलर नेहमी तुमच्या त्वचेच्या टोनपेक्षा एक टोन हलके असावे.फाउंडेशन आणि कन्सीलर नंतर, मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर आवश्यक आहे. ब्लशच्या मदतीने त्याचा वापर करा आणि फक्त हलका रंग वापरा.या स्टेप्स केल्यानंतर आता तुम्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता. डोळ्यांमध्ये जाड किंवा पातळ मस्करा लावा. याशिवाय लाइनर, मस्करा इत्यादी देखील वापरता येतात.शेवटी ओठांवर लिपस्टिक लावा. तुमच्या मेकअपचा लूक लिपस्टिकनंतरच येतो. लिपस्टिक नेहमी आउटफिटनुसार असावी. तुम्ही ऑफिसमध्ये हलकी लिपस्टिक लावू शकता.