डास तुम्हाला बघून काढतील पळ; घरी बनवा ही Mosquito Repellent क्रीम

डास चावल्यानेच त्रास देत नाहीत तर अनेक आजारांचे कारणही बनतात. केवळ डासांना पळवून लावणे पुरेसे नाही, तर त्यांच्या चावण्यापासून स्वतःला संरक्षित करणे देखील महत्वाचे आहे.

डास तुम्हाला बघून काढतील पळ; घरी बनवा ही Mosquito Repellent क्रीम
( फोटो: संग्रहित फोटो)

Stay Safe From Mosquitoes: पावसाळ्यात डासांचा फैलाव खूप वाढतो. डास चावल्यामुळे होणारे आजार देखील गंभीर असतात. डास दिसायला जरी छोटे असलेत तरी त्यांच्या चावल्याने अनेक प्राणघातक आजार देखील होऊ शकतात. डासांच्या अनेक प्रजाती असतात. या डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया सारखे गंभीर आजार पसरवतात. परंतु डास चावण्यापूर्वी खबरदारी घेतली तर या आजारांपासून आपण दूर राहू शकतो. पावसाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात डासांची संख्या प्रचंड वाढते, त्यामुळे या दिवसात त्यांना टाळण्याचे उपाय जाणून घेणे गरजेचे आहे. तर आम्ही तुम्हाला डासांना पळवून लावण्यासाठी घरच्याघरी बनवता येणारी क्रीम बद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या.

मॉस्किटो रिपेलेंट लोशन कसे बनवायचे?

डास चावण्यापासून वाचण्यासाठी अनेक क्रीम आणि औषधे बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये रसायने असतात जी आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. तर आपण डासांपासून बचावासाठी घरी क्रीम कशी बनवायची याबद्दल जाणून घेऊया.

( हे ही वाचा: Ayurvedic Tips: पावसाळ्यात ‘हे’ आयुर्वेदिक उपाय अनेक आजारांपासून संरक्षण करतील; औषध-गोळ्यांची गरज भासणार नाही)

क्रीम बनविण्यासाठी कोणत्या सामग्रीची आवश्यकता आहे?

डास टाळण्यासाठी, आपण मधाच्या पोळ्यापासून बनवलेलं मेणाचा उपयोग नैसर्गिक क्रीम आणि लोशन बनविण्यासाठी करू शकतो. यासाठी, मधाच्या पोळ्यापासून बनविलेल्या मेण व्यतिरिक्त १/४ कप, खोबरेल तेल, व्हिटॅमिन ई तेल (१/४ कप), स्टीरिक ऍसिड पावडर (१ टीस्पून), बेकिंग सोडा (१/४कप), कोमट पाणी (३/४ कप), निलगिरी तेल आणि सिट्रोनेला नैसर्गिक तेल आवश्यक असेल..

मॉस्किटो रिपेलेंट लोशन कसे बनवायचे?

  • लोशन तयार करण्यासाठी, प्रथम मधाच्या पोळ्यापासून बनवलेलं मेण खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई तेलाने गरम करा.
  • त्यानंतर कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून चमच्याने किंवा ब्लेंडरच्या मदतीने चांगले मिसळा.
  • आता खोबरेल तेल आणि मेणाच्या मिश्रणात पाणी घाला, ते नीट मिसळत नाही, म्हणून ब्लेंडर वापरा.
  • आता हे संपूर्ण मिश्रण काही वेळ बर्फात ठेवा.
  • त्यानंतर निलगिरीचे १० थेंब आणि सिट्रोनेला तेलाचे १० थेंब मिक्सरमध्ये मिसळा.
  • सुगंधासाठी क्रीममध्ये लैव्हेंडर किंवा मेंदी तेल घातले जाऊ शकते.
  • लोशन पूर्णपणे थंड झाल्यावर ते बाटलीत किंवा एअर टाईट डब्यात ठेवा.
  • हे लोशन दीर्घकाळ काम करेल.आणि डासांपासून संरक्षण करण्यासोबतच त्वचा सुंदर बनवेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Hair Care Tips : शॅम्पू लावल्यानंतर तुमचे केस आणखीनच गळतात का? ‘या’ टिप्समुळे होईल फायदा
फोटो गॅलरी