बाजरात कधी कोणत्या गोष्टीचे क्रेज येईल याचा नेम नसतो. सध्या बाजारात घड्याळांऐवजी फिटनेस बॅन्ड अनेकांच्या मनगटावर पाहायला मिळतात. हे फिटनेस बॅन्डचे क्रेज युवा पिढीसह कलाकार, राजकिय नेत्यांमध्येही पाहायला मिळते. जर तुम्हाला हा फिटनेस बॅन्ड खरेदी करायचा असेल तर बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या किंमतीचे ब्रॅन्ड उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असणारे बॅन्ड

MI BAND 3

सध्या बाजारात असलेला सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणाऱ्या बॅन्डमधील MI बॅन्ड 3 हा एक आहे. या बॅन्डची किंमत १,९९९ रुपये आहे. या बॅन्डची बॅटरी २० दिवसांपेक्षा अधिक काळ टिकते. हा बॅन्ड वॉटरफ्रूप असून त्याला टच स्क्रिन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा बॅन्ड ऑमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Amazfit Bip

या फिटनेस बॅन्डची किंमत ५,३९० रुपये आहे. या फिटनेस बॅन्डचे डिसाईन अॅपलच्या स्मार्ट वॉचसारखेच आहे. या बॅन्डमध्ये जीपीएस, अचूक हार्ट रेट ट्रॅकर, मल्टी-स्पोर्ट ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि व्हीओ 2 मॅक्स असे फिचर देण्यात आले आहेत. हा बॅन्ड वजनाने हलका असून त्याला उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आली आहे.

Huawei बॅन्ड 2 प्रो

Huawei बॅन्ड 2 प्रोची किंमत ५,३९० रुपये आहे. यामध्ये जीपीएस, स्टेप आणि स्लीप ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटर, व्हीओ 2 कमाल आणि बॅटरी लाइफसारखे फिचर देण्यात आले आहेत. या बॅन्डची ऑनलाईन खरेदी केली जाऊ शकते.

Garmin वीवोफिट 3

Garmin वीवोफिट 3 या बॅन्डची किंमत ६,९९९ रुपये आहे. या बॅन्डला उत्तम बॅटरी क्षमता आणि फिचर्स देण्यात आले आहेत. या बॅन्डचा डिस्प्ले इतर बॅन्डच्या तुलनेत लहान आहे.

Garmin वीवोस्मार्ट

या बॅन्डची किंमत ९,७८० रुपये आहे. हा बॅन्ड खास करुन जिमला जाणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. या बॅन्डमध्ये जीपीएस सिस्टमसारखे फिचर देण्यात आले आहेत.

Fitbit charge 2

सध्या बाजारात बॅन्डसाठी फिटबिट कंपनी प्रसिद्ध आहे. या बॅन्डची किंमत ९,७५० रुपये आहे. तसेच मोठी स्क्रिन, जीपीएस सेवा, हार्ट रेट मॉनिटरसारखे इतर फिचर देण्यात आले आहेत. इतर बॅन्डच्या मानाने हा बॅन्ड थोडा महागडा आहे पण यामध्ये सर्व फिचर देण्यात आले आहेत.