भारतात आज मोटोरोलाचे २ नवे स्मार्टफोन्स लॉंच झाले आहेत. मोटोरोला एज २० आणि मोटोरोला एज २० फ्यूजन (Moto Edge 20, Edge 20 Fusion) हे आज म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लॉंच करण्यात आले आहेत. खरंतर गेल्या महिन्यात युरोपियन बाजारात मोटोरोला एज २० मालिकेअंतर्गत एज २०, एज २० लाइट आणि एज २० प्रो हे लाँच करण्यात आले होते. तर आता त्यापैकी मोटोरोला एज २० आणि एज २० फ्यूजन भारतात लॉंच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत २१ हजार ४९९ रुपयांपासून सुरू होत आहे. लक्षात घेण्यासारखी बाब अशी कि, मोटोरोलाने भारतात एज २० प्रो हे मॉडेल लाँच केलेलं नाही. दरम्यान, मोटो एज २० फ्यूजन हे मोटो एज २० लाइट मॉडेलचंच बदललेलं नाव आहे. फक्त भारतात हे मॉडेल नाव बदलून लाँच करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंमत किती?

मोटो एज २० ची किंमत २९,९९९ रुपये इतकी असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अद्याप याचा फक्त एकच व्हेरिएन्ट सादर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये ८ जीबी रॅम आहे. मोटो एज २ फ्यूजनबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत २१,४९९ रुपये आहे, तर ८ जीबी व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे

मोटो एज २० दोन रंगांमध्ये लॉंच करण्यात आला आहे. मोटो एज २० फ्यूजन इलेक्ट्रिक ग्रेफाइट आणि सायबर टील व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. दरम्यान, मोटो एज २० ची विक्री २४ ऑगस्टपासून सुरू होईल. तर मोटो एज २० फ्यूजनची विक्री फ्लिपकार्टवर २७ ऑगस्टपासून सुरू होईल.

Moto Edge 20 फीचर्स

मोटो एज २० ला ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि १४४Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. कंपनी हा भारतातला सर्वात स्लिम ५ जी स्मार्टफोन असल्याचा दावा करत आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ प्रोसेसर देण्यात आला आहे.

मोटो एज २० मध्ये १०८ मेगापिक्सेलची प्रायमरी लेन्स देण्यात आली आहे. सोबत टेलीफोटो लेन्स देखील देण्यात आली आहे. एक मॅक्रो लेन्स आणि एक अल्ट्रा वाइड लेन्स आहे. तर सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटो एज २० मध्ये ४,००० mAh ची बॅटरी असून ३०W चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन १० मिनिटं चार्ज करून ८ तास चालवता येतो असा कंपनीचा दावा आहे.

Moto Edge 20 Fusion फीचर्स

मोटो एज २० फ्यूजनमध्ये ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८०० यू प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६ जीबी आणि ८ जीबी रॅम व्हेरिएंट देण्यात आले आहेत.

मोटो एज २० फ्यूजनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी आहे. यासोबत ३०W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moto edge 20 edge 20 fusion india launch know price features gst
First published on: 17-08-2021 at 15:50 IST