Eating 5 Mushrooms Daily benefits: मशरुम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मशरुममध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. सोबतच त्यात अनेक पोषणतत्व असतात. मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. मशरुममध्ये विटामिन डीदेखील असते. हे विटामिन हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतं. मशरुम खाल्ल्याने २० टक्के विटामिन डीची कमतरता भरून निघते. अशातच नवीन संशोधनानुसार, दिवसातून फक्त पाच लहान मशरुम खाल्ल्याने हृदयविकार, कर्करोग आणि स्मृतिभ्रंश यांसह अनेक रोगांचा सामना करण्यास मदत होऊ शकते.
जगभरात १४ हजार वेगवेगळ्या जातींचे मशरुम आहेत, मात्र आपण ते सगळेच खाऊ शकत नाही, कारण त्यातले काही मशरुम हे विषारीही आहेत. मशरूम फाउंडेशन ऑफ इंडियाच्या मते, मशरुममध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात, कॅलरी मूल्य कमी असते आणि म्हणूनच हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी शिफारस केली जाते. तृणधान्ये, फळे आणि भाज्यांच्या तुलनेत मशरुममध्ये जास्त प्रथिने असतात. मशरुम शिजवल्यानंतरही प्रथिने टिकून राहतात. मशरुममध्ये कमी उष्मांक, उच्च प्रथिने, उच्च फायबर सामग्री असल्याने ते मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी फायदेशीर आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >> खोकल्यावर औषधं घेऊनही आराम नाही? डॉक्टरांनी सांगितलेलं हे संत्र्याचं सिरप बनवा घरच्या घरी
भारतात आठ सर्वात लोकप्रिय मशरुम आहेत, त्यातलाच एक लहान, बंद टोपी आणि हलके तपकिरी किंवा फिकट पांढऱ्या रंगाचा मशरुम जगभरात उगवलेला आणि वापरला जाणारा सर्वात लोकप्रिय मशरुम प्रकार आहे. यामध्ये जीवनसत्त्वे (बी जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन डी), खनिजे (सेलेनियम, तांबे, पोटॅशियम) आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा हा चांगला स्रोत आहे. शिताके मशरुम, कॉर्डीसेप्स मशरुम, लायन्स माने मशरुम, रेशी मशरुम, टर्की टेल मशरुम आणि चागा मशरुम या भारतात आढळणाऱ्या इतर जाती आहेत.