Nag Panchami 2026 Wishes In Marathi : श्रावण महिन्याची सुरुवात होताच आसमंतात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य पसरते. श्रावण शुक्ल पंचमीला साजरा केला जाणारा ‘नागपंचमी’ हा श्रावणातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण. यंदा नागपंचमी २०२६ च्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकर्यांचा मित्र मानल्या जाणार्या नागदेवतेविषयी कृतज्ञता, आदर आणि निसर्गाचे जतन करण्याचा संदेश देणारा हा सण संपूर्ण देशात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो.
या मंगल प्रसंगी आपल्या नातेवाइक, मित्रांना आणि स्नेहीजनांना डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, खास तुमच्यासाठी १० नवीन आणि आकर्षक मराठी शुभेच्छा संदेश (Nag Panchami 2026 Wishes & Status In Marathi) खालीलप्रमाणे आहेत:
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! (Nag Panchami shubhechha wishes In Marathi)
दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला..
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा…!

नागपंचमी भक्तांसाठी उत्सव भारी
नागदेवता बळीराजाचा आहे कैवारी
नागदेवतेची पूजा करावी मनोभावी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा
श्रावण सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुंधरा, घेतला हाती हिरवा शेला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षण करू या नागराजाचे, जतन करू या निसर्गदेवतेचे…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नागपंचमीच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा! (Nag Panchami Status, Quotes, Messages In Marathi)
रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची, परी तूच खरा मित्र,
पाठ राखीतो बळीराजाची.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नागपंचमीचा मनापासून शुभेच्छा तुम्हाला

समुद्रमंथनानं कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा
हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करू या
नागपंचमीच्या दिवशी निसर्गाचे जतन करू या
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागोबाचे रक्षण करू, हीच खरी नागपंचमी…
श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी,
तुमचे आयुष्य मंगलदायी असावे..
नागपंचमीच्या शुभेच्छा!
