Nail Changes And Symptoms Of Disease: नेहमी स्वच्छ, मजबूत आणि सुंदर नखं केवळ सौंदर्यच नव्हे तर आरोग्याचं द्योतकही असतात. पण जर नखांवर अचानक पांढऱ्या, काळ्या किंवा तपकिरी रेषा दिसायला लागल्या, नखं तुटू लागली किंवा त्यांचा रंग बदलू लागला तर ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. अनेकदा आपण हे सौंदर्यदृष्टीने पाहतो, पण या रेषा शरीरात चाललेल्या गंभीर घडामोडींचं लक्षणही असू शकतात. तुम्हाला माहीत आहे का की ज्याप्रमाणे डॉक्टर रुग्णाची जीभ पाहून त्याचे आरोग्य ठरवू शकतात, त्याचप्रमाणे ते त्यांच्या नखांना पाहूनही त्याचे आरोग्य ठरवू शकतात? हो, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा रुग्ण आजारी असतो तेव्हा डॉक्टर त्यांची नखंदेखील तपासतात. कारण नखं तुमच्या आरोग्याबद्दल अनेक रहस्य उघड करू शकतात. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या नखांद्वारे तुमचे चांगले आणि वाईट आरोग्य सहजपणे ओळखू शकता. कसे ते जाणून घेऊया.

नखांवर पांढरे डाग का दिसतात?

बहुतेक लोकांच्या नखांवर पांढरे डाग असतात. सामान्यतः असे मानले जाते की, हे डाग कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात. मात्र, प्रत्येक वेळी हे खरे नाही. शिवाय, नखांवर असलेले हे पांढरे डाग खनिजांच्या कमतरतेचे संकेत देतात. शिवाय, नखांवर पांढरे डाग अॅलर्जी, बुरशीजन्य संसर्ग किंवा नखांना झालेल्या दुखापतींमुळे होऊ शकतात. याव्यतिरिक्त, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे, एक्झिमा, न्यूमोनिया आणि आर्सेनिक विषबाधा यामुळेदेखील नखांवर असे डाग येऊ शकतात. म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला तुमच्या नखांवर पांढरे डाग दिसले तर निष्काळजी राहू नका, कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नखाखाली काळ्या रेषा

जर नखांवर काळ्या, तपकिरी किंवा निळसर रेषा स्पष्टपणे दिसू लागल्या तर याला ‘मेलेनोनीचिया’ म्हणतात. यामागे त्वचेवर आघात झालेला असू शकतो किंवा एखादा औषधांचा दुष्परिणामही कारणीभूत ठरू शकतो. पण, काही वेळा यामागे त्वचेशी संबंधित कर्करोगाची सुरुवातदेखील असू शकते, त्यामुळे काळ्या रेषा दिसल्या तर त्याचं कारण फक्त धूळ किंवा रंगद्रव्य नाही हे लक्षात घ्या. अशा रेषा वेदनादायक असतील, रक्तस्त्राव होत असेल किंवा त्या जसंच्या तशाच राहून वाढत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावं.

नखांवरील चंद्र हे चांगले लक्षण नाही

आयुर्वेदानुसार, जर तुमच्या नखांवर चंद्रकोरीच्या आकाराचे चिन्ह दिसले तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले लक्षण नाही. असे चिन्ह कमकुवत पचनसंस्थेचे लक्षण आहे.

निळी किंवा हिरवी नखं

निळी नखं शरीरात ऑक्सिजनची कमतरता दर्शवतात, तर हिरवी नखं पॅरोनीचिया नावाच्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतात.

खडबडीत आणि भेगा पडलेली नखं

महिलांमध्ये खडबडीत आणि भेगा पडणारी नखं ही एक सामान्य समस्या आहे. ही नखं हायपोथायरॉईडीझम किंवा लोहाच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. जर तुमच्या नखांमध्ये हे दिसून येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नखं पिवळी का होतात?

कधीकधी संसर्गामुळे किंवा नेलपॉलिशसारख्या उत्पादनांमुळे नखं पिवळी पडतात. तथापि, काही काळानंतर ती स्वतःच निघून जातात. जर पिवळी नखं बराच काळ टिकून राहिली तर ते संसर्गाचे लक्षण असू शकते. शिवाय, ते थायरॉईड किंवा मधुमेहाचेदेखील लक्षण असू शकते. बरेच लोक यलो नेल सिंड्रोम (YNS) नावाच्या दुर्मीळ आजारानेदेखील ग्रस्त आहेत. फुप्फुसांच्या समस्या असलेल्या लोकांना ही स्थिती सर्वात जास्त आढळते.