Nail Care Tips: हातांच्या सौंदर्यात लांब आणि सुंदर नखे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हाताच्या लांब नखांवर रंगीबेरंगी नेलपॉलिश म्हणजे काही औरच. पण, पावसाळ्यात मात्र नखांची योग्य ती काळजी न घेतल्यास नखे खराब होऊ शकतात. चला तर मग पाहूया पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्यायची ते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खराब नखे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी व शॅम्पूदेखील वापरू शकता. अशा वेळी कोमट पाण्यात शॅम्पू, गुलाबपाणी व थोडेसे रॉक सॉल्ट घाला. आता तयार मिश्रणात नखे बुडवा आणि मग हलक्या हातांनी ती स्वच्छ करा. असे केल्याने नखे सहज स्वच्छ करता येतात.

नखे कोरडी ठेवा

पावसाळ्यात तुमच्या हाता- पायांची नखे आणि हात- पाय नेहमी कोरडे ठेवा. पावसाळ्यात बाहेर गेल्यावर अनेकदा आपले पाय साठलेल्या अस्वच्छ पाण्याच्या संपर्कात येतात; ज्यामुळे पायांच्या नखांचे नुकसान होऊ शकते. दमट वातावरणाचा परिणाम म्हणून मृत त्वचेच्या पेशी आणि संसर्गजन्य जीवाणू त्वचेवर जमा होतात. त्याव्यतिरिक्त दिवसभर बंद लेदर शूज घालणे टाळा. कारण- अशा वातावरणात बुरशीची वाढ झपाट्याने होते. बाहेर जाताना शक्यतो उघडे शूज, फ्लोटर्स किंवा चप्पल घाला. तसेच घरातील एखादे काम केल्यावर हात धुतल्यानंतर हाच स्वच्छ कोरडे करा.

पाण्यात काम करताना हातमोजे घाला

स्वच्छतेची व पाण्यात कामे करताना रबराचे हातमोजे वापरा. स्वच्छतेसाठी कठोर रसायने वापरत असाल किंवा बागकाम करीत असाल किंवा तुमचे हात गरम किंवा साबणाच्या पाण्याच्या संपर्कात येत असतील अशा स्वरूपाची कोणतीही कामे तुम्ही करीत असाल, तर तुमची नखे खराब होऊ शकतात. म्हणूनच पाण्यात काम करताना रबर किंवा प्लास्टिकचे हातमोजे वापरा. तसे केल्याने तुमची नखे आणि तुमचे नेलपॉलिश अशा दोहोंचेही संरक्षण होते आणि त्वचा हानिकारक रसायनांच्या संपर्कात येत नाही.

नखांना मध लावा

नखाच्या आजूबाजूंची त्वचा अर्थात क्युटिकल्स खराब होत असतील, तर नखांना आणि नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला मध लावा. मध लावून, नखे १५ मिनिटे तशीच ठेवा. नंतर नखे पाण्याने धुऊन स्वच्छ करावीत. मधामुळे नखाच्या आजूबाजूच्या त्वचेला नैसर्गिक माॅइश्चरायझर मिळते.

हेही वाचा >> कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ‘हे’ दोन योगा करा; नेहमीच दिसाल तरुण

लिंबाचा रस

लिंबाचा रस तुमची नखे स्वच्छ करण्यासाठीही खूप उपयुक्त ठरू शकतो. जरी काही लोकांना असे वाटते की, लिंबाचा रस तुमची नखे पिवळी करू शकतो; परंतु तसे नाही. लिंबाचा रस आणि लिंबाची साल वापरून तुम्ही नखे स्वच्छ करू शकता. हे लक्षात ठेवा की, जेव्हाही तुम्ही तुमची नखे स्वच्छ कराल तेव्हा मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. असे केल्याने नखे तर स्वच्छ दिसतीलच; पण ती चमकदारही होतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nail care tips five easy tips on good nail hygiene during the monsoon season srk
Show comments