Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ‘कार्डियाक अरेस्ट’ने आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकरांच्या अचानक जाण्यामुळे मराठी रंगभूमी ते बॉलीवूड क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
चला तर जाणून घेऊया हार्ट अटॅक, ‘कार्डियाक अरेस्ट’ येण्याआधी दिसून येणारी लक्षणे. जेव्हा हृदय अचानक थांबते तेव्हा नक्की काय घडते आणि हृदयविकाराशी संबंधित आणीबाणीची स्थिती (‘कार्डियाक अरेस्ट’ ) कशी ओळखावी? दिल्ली येथील सी.के. बिर्ला हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अंशुल कुमार जैन यांनी कोणती लक्षणे दिसल्यास लोकांनी काय करावे, याबद्दल माहिती देतात.

“हृदयक्रिया बंद पडणे हे सहसा अचानक घडते आणि त्यामुळे मदतीसाठी फार कमी वेळ मिळतो,” असे डॉ. जैन म्हणतात. व्यक्ती अचानक कोसळू शकते, प्रतिसाद देणे थांबवू शकते आणि तिचा सामान्य श्वास थांबू शकतो. ”यावेळी जरी कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना मिळत नसली तरी काही लोकांना हृदयक्रिया बंद पडण्याच्या थोड्या वेळापूर्वी लक्षणे जाणवू शकतात. कधी कधी एखाद्या व्यक्तीला छातीत अस्वस्थता जाणवणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे यांसारखी पूर्वसूचना देणारी लक्षणे थोड्या वेळापूर्वी जाणवू शकतात,” असे ते म्हणतात. “तथापि, हृदयक्रिया बंद पडणे कोणत्याही स्पष्ट पूर्वसूचनेशिवायही होऊ शकते. असामान्य श्वासोच्छ्वासालाही अनेकदा सामान्य श्वासोच्छवास समजण्याची चूक होऊ शकते. जर एखादी व्यक्ती अचानक कोसळली, प्रतिसाद देत नसेल आणि तिचा श्वासोच्छ्वास सामान्य नसेल, तर त्वरित पावले उचलणे अत्यंत आवश्यक असते.

हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा ‘कार्डियाक अरेस्ट’ भिन्न कसे?

कार्डिअॅक अरेस्टला म्हणजेच हृदयविकाराचा झटका असा सर्वसामान्य समज आहे,मात्र हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. डॉक्टरांच्या मते, रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते, तेव्हा कार्डिअॅक अरेस्ट होतो. यामध्ये हृदयातून इतर अवयवांना होणारा रक्तपुरवठा बंद होतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्याने आधी शुद्ध हरपते. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर हार्ट अटॅक सर्क्युलेटरी समस्या आहे, तर कार्डिअॅक अरेस्ट हा इलेक्ट्रिक कंडक्शनच्या बिघाडामुळे होतो. कार्डिअॅक अरेस्ट ही मेडिकल इमर्जन्सी आहे. रुग्णाला शॉक देऊन हृदयाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरु केले जाऊ शकते.

कार्डिअॅक अरेस्टची लक्षणं काय?

खरंतर कार्डिअॅक अरेस्ट अचानक होतो. पण ज्यांना हृदयाचा आजार आहे, त्यांच्यात कार्डिअॅक अरेस्टची शक्यता जास्त असते. कधी कधी कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, छातीत धडधड, चक्कर, शुद्ध हरपणं, थकवा किंवा अंधारी येणं यांसारखी लक्षणं आढळतात.

हृदयविकाराचा झटका आल्यावर नेमकं काय होतं?

चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे हृदयविकाराचा झटका म्हणजे नेहमीच छाती पकडून खाली कोसळणे, असे होत नाही. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये नेहमीच छातीत तीव्र आणि दाबल्यासारखी वेदना होते, हा एक अत्यंत धोकादायक गैरसमज आहे,” असे डॉ. जैन म्हणतात. “वास्तविक पाहता, याची लक्षणे खूप वेगळी असू शकतात.”

एखाद्या व्यक्तीला छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दाब, जडपणा, पिळवटल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ही अस्वस्थता शरीराच्या इतर भागांपर्यंतही पसरू शकते.

ही अस्वस्थता हात, खांदा, पाठ, मान, जबडा किंवा पोटाच्या वरच्या भागापर्यंत पसरू शकते,” असे ते सांगतात.

इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, अंगावर थंड घाम येणे, मळमळणे, असामान्य अशक्तपणा आणि चक्कर येणे यांचा समावेश असू शकतो.

काही लोकांमध्ये, विशेषतः वृद्ध आणि मधुमेही रुग्णांमध्ये लक्षणे तितकीशी स्पष्ट नसू शकतात,” असे डॉ. जैन स्पष्ट करतात.

अवतीभोवतीच्या माणसांनी चटकन काय करायला हवं?

१. “त्या व्यक्तीने शारीरिक श्रम थांबवावेत, सुरक्षितपणे बसावे किंवा झोपावे आणि स्वतः गाडी चालवून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्यावी,” असा सल्ला डॉ. जैन देतात.

२. उपस्थित लोकांनी छातीत वेदना जाणवणं, हातपाय सुन्न पडणं. श्वास घ्यायला होणं ही लक्षणं हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात. अशा वेळी अॅक्युप्रेशर पॉईंट दाबून ठेवा. मोठ्यानं श्वास घ्या किंवा मोठ्या शिंकण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी वेळ मिळतो आणि हार्ट अटॅकपासून बचाव होऊ शकतो.

३. जेव्हा एखाद्याला हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिअॅक अरेस्ट येतो तेव्हा आपण सर्वप्रथम आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

४. रुग्ण बेशुद्ध असल्यास सीपीआर सुरू करा. जर व्यक्ती श्वास घेत नसेल किंवा तुम्हाला नाडी सापडत नसेल, तर आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी कॉल केल्यानंतर रक्तप्रवाह सुरू ठेवण्यासाठी CPR सुरू करा.

५. आरोग्यदायी, संतुलित आहार घ्या. अतिरिक्त चरबी/तेल/मांस टाळा, हिरव्या भाज्या, फळे, काजू यांचा समावेश करा. तुमचा रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल नियमित तपासा.

६. नियमित व्यायाम करा. हृदयविकाराच्या झटक्यामागे लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीम घटक आहे.