Narali Purnima 2022: नारळी भात, सोलकढी ते खोबऱ्याचं आईस्क्रीम असा करा नारळी पौर्णिमेचा खास बेत, पहा रेसिपीज

Narali Purnima 2022 Recipes: नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन एकत्र आल्याने आपण बंधुरायांसाठी किंवा भावांनो आपल्या लाडक्या बहिणाबाईंसाठी काही खास पदार्थांचा बेत करू शकता.

Narali Purnima 2022: नारळी भात, सोलकढी ते खोबऱ्याचं आईस्क्रीम असा करा नारळी पौर्णिमेचा खास बेत, पहा रेसिपीज
Narali Purnima Special Recipes (फोटो: Youtube)

Narali Purnima 2022 Recipes: श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागल्यावर दोन महिन्यांपासून बंद असणारा मच्छीमारीचा धंदा पुन्हा सुरु होतो. येऊ घातलेल्या मौसमात दर्याराजाने आपले रक्षण करावे व व्यवसाय सुरळीत व्हावा यासाठी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. यादिवशी खास नारळाच्या रेसिपीज बनवण्याची पद्धत आहे. यंदा ११ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाची तिथी एकत्र आल्याने आपण आपल्या बंधुरायांसाठी किंवा भावांनो आपल्या लाडक्या बहिणाबाईंसाठी काही खास पदार्थांचा बेत करू शकता. अशा काही पारंपरिक पदार्थांच्या सोप्या रेसिपीज आज आपण पाहणार आहोत.

नारळी पौर्णिमेला विशेषतः नारळी भात, नारळाच्या वड्या, लाडू असे गोडाचे पदार्थ बनवण्याची रीत आहे. मात्र आपल्याला फार गोड आवडत नसेल किंवा मधुमेह व रक्तदाब इत्यादी कारणांनी गोड खायचे नसेल तर नैवैद्यापुरती एक रेसिपी गोडाची करून आपण नारळाचा अन्य चविष्ट बेत सुद्धा करू शकता. अशा काही मिक्स रेसिपीज आता आपण जाणून घेणार आहोत..

नारळी भात

सोलकढी

नारळाच्या वड्या

ओल्या नारळाची चटणी

खोबऱ्याचं आईस्क्रीम

Video: कॉफी प्या आणि Cups खा! कुकीज कपची ही भन्नाट रेसिपी घरी ट्राय करून बघाच

ओल्या खोबऱ्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्वचा, केस यांच्या सुदृढतेसाठी खोबऱ्याचं तेल नामी उपाय आहे. त्यामुळे केवळ नारळी पौर्णिमेलाच नव्हे तर इतरही दिवशी आपण जेवणात ओल्या खोबऱ्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narali purnima special recipes tender coconut icecream solkadhi narali bhat recipe at home watch video svs

Next Story
स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेसाठी ‘या’ सुपरफूडचा आहारात समावेश करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी