scorecardresearch

National Safety Day 2022: का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करावा यासाठी नेशनल सेफ्टी काउंसिलने पुढाकार घेतला होता. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात ४ मार्च १९७२ पासून झाली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा दरवर्षी ४ मार्च रोजी साजरा केला जातो. (फोटो क्रेडिट: प्रतिनिधिक फोटो)

देशभरात ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातोय. सध्या हा दिवस एका सप्ताहाच्या स्वरूपात साजरा केला जातोय. देशातील नागरिकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे आणि देशातील दुर्घटना थांबवणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

इतिहास

राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करावा यासाठी नेशनल सेफ्टी काउंसिलने पुढाकार घेतला होता. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात ४ मार्च १९७२ पासून झाली आहे. या दिवशी भारतात नेशनल सेफ्टी काउंसिलची स्थापना झाली होती, म्हणून हा दिवस नेशनल सेफ्टी डे या रुपात साजरा केला जातो. नेशनल सेफ्टी काउंसिल एक स्वायत्त संस्था आहे जी सार्वजनिक सेवेसाठी गैर शासकीय आणि गैर लाभकारी संघटनच्या रुपात कार्य करते. या संघटनाची स्थापना १९६६ मध्ये मुंबई सोसायटी अधिनियम अंतर्गत झाली होती ज्यात आठ हजार सदस्य सामील होते.

महत्त्व

४ ते १० मार्च या दरम्यान साजरा होणार्‍या या आठवड्यात लोकांना जागरुक केलं जातं. सामान्य लोकांमध्ये सुरक्षेप्रती जागरुकता यावी तसेच अपघात होऊ नये हा उद्देश्य आहे. या आठवड्यात विभिन्न जागरुकता कार्यक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक अपघातांपासून बचाव करण्याचे उपाय सांगण्यात येतात. या पूर्ण आठवड्यात केल्या जाणार्‍या क्रियाकलापांचा उद्देश्य लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी जागरुक करणे आहे. कारखान्यात काम करताना सुरक्षिततेची साधने वापरावी तसेच इमरजेंसी कशी हातळावी, राष्ट्रीय संपत्तीचे जतन आणि संवर्धन याचे देखील महत्तव असल्याची जाणीव करुन दिली जाते.

थीम

राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे स्मरण दरवर्षी एका थीमवर आधारित असते. म्हणून, राष्ट्रीय सुरक्षा दिन २०२२ ची थीम “रस्ता सुरक्षा”ही आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National safety day 2022 date theme history and significance and more scsm

ताज्या बातम्या