scorecardresearch

पांढरे केस देतायत त्रास? आवळ्याच्या नैसर्गिक हेअर डायने मिळवा काळेभोर केस; जाणून घ्या कशी बनवाल पेस्ट

Natural Dye For White Hair: अँटिऑक्सिडंटसचा खजिना असणारा आवळा हा केसाची मुळ मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. आज आपण पांढऱ्या केसाची समस्या नैसर्गिक पद्धतीने कशी सोडवता येईल हे पाहणार आहोत.

पांढरे केस देतायत त्रास? आवळ्याच्या नैसर्गिक हेअर डायने मिळवा काळेभोर केस; जाणून घ्या कशी बनवाल पेस्ट
आवळ्याच्या नैसर्गिक हेअर डायने मिळवा काळेभोर केस (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Natural Dye For White Hair: माझे केस काय उन्हात उभं राहून पांढरे झालेले नाहीत, हे एक वाक्य आपण साधारण अनेकदा ऐकलं असेल. याचा अर्थ असा की माझे केस हे वयोमानानुसार अनुभव घेऊन पांढरे झाले आहेत. पण आजकाल केवळ वयस्करच नव्हे तर अगदी शाळकरी मुलामुलींचे केसही अगदी लहान वयात पांढरे होऊ लागले आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे निष्काळजीपणा! अनेकांची जीवनशैली अलीकडे एवढी बदलली आहे की त्यांना केसाला तेल लावून मसाज वैगरे तर सोडाच पण साधं केस विंचरायला सुद्धा जीवावर येतं, यामुळेच वेळेआधीच केस पांढरे होण्याचा त्रास उद्भवतो.

पांढऱ्या केसावर उपाय म्हणून केस रंगवण्याचा प्रकार करणं म्हणजे केस खराब होण्यात खतपाणी घालण्यासारखं आहे. एका अहवालानुसार १९८० मध्ये जेव्हा पासून महिलांनी केस रंगवण्याची सुरुवात केली तेव्हापासून ३० टक्के महिलांमध्ये कँसरचे प्रमाण वाढल्याचे समजत आहे. आज आपण पांढऱ्या केसाची समस्या नैसर्गिक पद्धतीने कशी सोडवता येईल हे पाहणार आहोत.

हेल्थलाईनच्या वृत्तानुसार केमिकलयुक्त केस रंगवण्याच्या पावडरमुळे केसगळती, ऍलर्जी, केसाची वाढ खुंटणे. डोळे व मज्जासंस्थेवर परिणाम असे अनेक त्रास जोडून येतात. यावर उपाय म्हणून आज आपण थंडीच्या दिवसात येणाऱ्या आवळ्याचा वापर करून कशा प्रकारे नैसर्गिक पद्धतीने आपले केस काळेभोर करू शकता हे जाणून घेऊयात.

अँटिऑक्सिडंटसचा खजिना असणारा आवळा हा केसाची मुळ मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. जर तुमची आवळ्यासह शिकेकाईचा सुद्धा वापर केला तर केस केवळ काळेच नव्हे तर हेल्दीही होऊशकतील. केसाला मजबुती देण्यासाठी आपल्याला सामग्री व कृती फॉलो करायची आहे.

सामग्री

  • एक मूठभर सुकलेल्या आवळ्याची पावडर
  • एक छोटी वाटी शिकेकाई
  • एक कप पाणी

आवळ्याचा हेअर डाय कसा बनवाल? (How to make natural hair dye)

एका लोखंडी कढईत पाणी उकळायला ठेवा. आता या पाण्यात आपण घेतलेली आवळ्याची पावडर व शिकेकाई पावडर टाकून १० मिनिटे शिजू द्या. १० मिनिटांनी जेव्हा आपण गॅस बंद कराल तेव्हा कढईत एक जाडसर पेस्ट तयार झाली असेल. ही पेस्ट थंड झाल्यावर काळपट रंगात दिसेल. तुमच्या केसांच्या मुळाला ही पेस्ट लावून मग एक एक बट घेऊन त्याला ही पेस्ट लावा. थोड्यावेळ ठेवून मग मर्जीप्रमाणे थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवून घ्या.

हे ही वाचा<< आवळ्याच्या मदतीने तोंड व पोटाच्या अल्सरवर करा कायमची मात; थंडीत किती व कसा आवळा खावा?

दरम्यान नैसर्गिक उत्पादन जाहिरात करणाऱ्या ब्रॅण्ड्सला सुद्धा त्यांचं उत्पादन टिकण्यासाठी केमिकल वापरावे लागते. जर या केस रंगवण्याच्या पावडरमध्ये अमोनिया किंवा पेराबेज सारखे विषारी रसायन असेल तर याचा परिणाम केवळ केसावरच नव्हे तर तुमच्या डोळ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके नैसर्गिक व घरगुती उत्पादन वापरणे आपल्यासाठी हिताचे ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 16:16 IST

संबंधित बातम्या