Natural Ways to Improve Vision: मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही… या सगळ्यांच्या प्रकाशात दिवसाचा मोठा हिस्सा जातोय. परिणामी डोळ्यांवर सतत ताण येतो, दृष्टी धूसर होते, डोळे कोरडे पडतात आणि अनेकांना कमी वयातच चष्म्याचा नंबर वाढत असल्याचं जाणवतं. पण, आश्चर्य म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा योग्य वापर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो, असं आयुर्वेदात शेकडो वर्षांपासून सांगितलं जातं.

अनेकांना प्रश्न पडतो, “खरंच का? साधं घरगुती मिश्रण दृष्टीला मदत करू शकतं?” आयुर्वेदिक परंपरेनुसार, काही नैसर्गिक घटक शरीरातील वात-पित्त समतोल ठेवतात, डोळ्यांना पोषण देतात आणि ताण कमी करत असल्याचं मानलं जातं.

स्क्रीन टाइम वाढल्याने दृष्टी घटू शकते?

  • आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण दिवसातून किमान १०-१२ तास स्क्रीनसमोर असतो, यामुळे डोळ्यांवर ताण वाढतो, दृष्टी धूसर होते
  • डोळे लालसर व कोरडे पडतात
  • डोळ्यांचे स्नायू थकतात

डोळ्यांना आवश्यक असणारे व्हिटॅमिन A, C, E आणि ओमेगा-३ यांची कमतरता पडली तर ही समस्या अधिक वाढू शकते; त्यामुळे डोळ्यांना पोषण द्यायला योग्य आहार, कमी स्क्रीन टाइम आणि नियमित विश्रांती हे तितकेच महत्त्वाचे आहे.

आयुर्वेदिकतज्ज्ञ सांगतात, “या तीन गोष्टींचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते.” हरिद्वार येथील आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉ. दीपक कुमार यांच्या मतानुसार, काही नैसर्गिक घटकांचा संयमित वापर डोळ्यांसाठी उपयुक्त मानला जातो. त्यात तूप, काळी मिरी आणि खडीसाखर (मिश्री) यांचा खास उल्लेख केला जातो. या तिन्हींचे मिश्रण पारंपरिक आयुर्वेदात “दृष्टीसाठी उपयुक्त” मानले गेले आहे.

मिश्रण कसे तयार करायचे?

घरात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या या तिन्ही वस्तूंचा एकत्रित मेळ तयार करण्याची पद्धत अशी आहे

  • ५० ग्रॅम काळी मिरीचे बारीक चूर्ण
  • २०० ग्रॅम धाग्याची खडीसाखर (चूर्ण करून)
  • २५० ग्रॅम तूप
  • सर्वप्रथम तूप हलके गरम करावे.
  • यानंतर काळी मिरीचे चूर्ण आणि खडीसाखरचे चूर्ण तुपात मिसळावे.
  • हे मिश्रण थंड होऊ द्यावे आणि स्वच्छ बरणीत भरून ठेवावे.

सेवन पद्धत (आयुर्वेदिक मतानुसार):

  • सकाळी आणि रात्री एक चमचा मिश्रण कोमट दुधासोबत घ्यावे, असे मत मांडले जाते.
  • तूप, काळी मिरी आणि खडीसाखर – डोळ्यांना कसे उपयुक्त?

आयुर्वेदिक दृष्टीने या तिन्हींचे गुणधर्म असे सांगितले गेले आहेत:

१) तूप

  • तुपात नैसर्गिक व्हिटॅमिन A आणि D असतात
  • ते डोळ्यांच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त मानले जाते.
  • डोळ्यांच्या स्नायूंना पोषण देत असल्याचे मत.

२) काळी मिरी

  • रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
  • डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंचा ताण कमी करण्यास उपयुक्त मानले जाते.
  • मेंदू व डोळ्यांपर्यंत पोषण पोहोचवण्यात सहाय्य.

३) खडीसाखर

  • थंड प्रकृतीची असल्याने डोळ्यांना शांतता मिळते.
  • थकवा कमी करायला मदत.

डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणखी काय करता येईल?

  • हिरव्या भाज्या, गाजर, बदाम, अक्रोड यांचा आहारात समावेश करावा.
  • आठवड्यात काही तास स्क्रीन-डिटॉक्स
  • पुरेशी झोप
  • धूम्रपान व मद्यपान टाळणे
  • पापण्यांचे व्यायाम पलकझपक, फोकस बदलणे, डोळे फिरवणे

ही माहिती आयुर्वेदिक परंपरेतील मतांवर आधारित आहे, वैद्यकीय दावा नाही. डोळ्यांबाबत गंभीर त्रास असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.