उद्या १२ ऑक्टोबर रोजी नवरात्रीची सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्री देवीची पूजा केली जाते. नवदुर्गामध्ये माता कालरात्री देवी ही सातवी दुर्गा मानली जाते. कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधार्या रात्रीप्रमाणे काळा, डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. या चतुर्भुज देवीचे वाहन गाढव असते. उजव्या एका हाताची अभय व दुसर्याची वरमुद्रा आहे. एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसर्या हातात तलवार आहे. उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणाऱ्या या देवीला शुभंकरी म्हणतात.सप्तमी तिथीला कालरात्री देवीला पूजा केल्याने शनीचे अशुभ प्रभाव टळतात आणि सर्व सिद्धी प्राप्त होते.

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
ram navami 2024 date tithi and shubh muhurat know significance of the birth anniversary of lord shri ram
Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी २तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या तिथी, मुहूर्त वेळ व पूजा विधी

देवी कालरात्रीच्या पूजेत या मंत्रांचा जप करा:

‘एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता,
लम्बोष्टी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी। वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा,
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥’
-ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते।।

जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणि।
जय सर्वगते देवि कालरात्रि नमोस्तु ते।।

-ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे।

कालरात्री देवीची पूजा विधि:

सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास पूजेत जांभळ्या रंगाचे कपडे घाला.
सर्वप्रथम गणपतीची पूजा करा. गणेशजींना फुले, हार, चंदन अर्पण करा. नंतर त्यांना दही, दूध, साखर, मध घालून आंघोळ घाला.
नैवेद्य दिल्यानंतर आचमन आणि नंतर पान, सुपारी अर्पण करा.
त्यानंतर माता कालरात्रीची पूजा सुरू करा. हातात फूल घेऊन दुर्गा मातेचे ध्यान करा.
मग पंचोपचार पूजा करा आणि देवीला लाल फुले, अक्षता, कुंकू, शेंदूर इत्यादी अर्पण करा.
तूप किंवा कापूर जाळून माता कालरात्रीची आरती करा आणि तिला गूळ अर्पण करा.
दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करा.
पूजेनंतर माता कालरात्री आणि माता दुर्गा यांची आरती करा.
पूजेनंतर गरजूंना दान करा.

कालरात्रीच्या पूजेचे फायदे:

असं म्हणतात की, देवीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने भय, अपघात आणि रोग नष्ट होतात. ज्योतिष शास्त्रानुसार, माता कालरात्री शनि ग्रहावर नियंत्रण ठेवते. म्हणून असं मानलं जातं की माता कालरात्री देवीची पूजा केल्याने शनीचे दुष्परिणाम कमी होतात. असंही मानलं जातं की या देवीची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळवता येतो.

माता कालरात्री देवीची आरती:

कालरात्रि जय जय महाकाली
काल के मुंह से बचाने वाली
दुष्ट संहारिणी नाम तुम्हारा
महा चंडी तेरा अवतारा
पृथ्वी और आकाश पर सारा
महाकाली है तेरा पसारा
खंडा खप्पर रखने वाली
दुष्टों का लहू चखने वाली
कलकत्ता स्थान तुम्हारा
सब जगह देखूं तेरा नजारा
सभी देवता सब नर नारी
गावे स्तुति सभी तुम्हारी
रक्तदंता और अन्नपूर्णा
कृपा करे तो कोई भी दु:ख ना
ना कोई चिंता रहे ना बीमारी
ना कोई गम ना संकट भारी
उस पर कभी कष्ट ना आवे
महाकाली मां जिसे बचावे
तू भी ‘भक्त’ प्रेम से कह
कालरात्रि मां तेरी जय