आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे करण्यात येत असतात. श्रावण महिना सुरू झाल्यापासून अनेक हिंदू सण येत असतात. श्रावण महिना हा सणांचा महिना असतो त्या महिन्यापासून आपल्या हिंदू सणांना सुरुवात होते. आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांपैकी नवरात्र उत्सव हा एक महत्त्वपूर्ण सण आहे, नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. नवरात्री उत्सव नऊ दिवस चालतो. आपल्या अनेक हिंदू सण आणि उत्साहाने पैकी नवरात्री या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. 

आज म्हणजेच २६ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे, जो हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. संपूर्ण नऊ दिवस विधीपूर्वक माँ दुर्गेची पूजा केली जाते. या वेळी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. देशातील विविध राज्यांमध्ये नवरात्रोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर जाणून घेऊया. कशा पद्धतीने होतोय साजरा हा नवरात्रोत्सव.

Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

बंगालची दुर्गा पूजा

पश्चिम बंगालमध्ये नवरात्र हा वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे. इथे नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’ मोठ्या समर्पणाने, थाटामाटात आणि झगमगाटात साजरा केला जातो. ठिकठिकाणी पंडाळे सजवले जातात ज्यात सकाळ संध्याकाळ दुर्गा देवीची पूजा आणि आरती केली जाते. विविध प्रकारचा प्रसाद तयार करून त्याचे वाटप केले जाते. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीचा उत्सव सहाव्या दिवसापासून सुरू होतो आणि दहाव्या दिवसापर्यंत चालतो. दुर्गापूजेचा प्रत्येक दिवस इथल्या लोकांसाठी खूप खास असतो.

आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

गुजरातचा गरबा

नवरात्रीची खरी धूम ही गुजरातमध्ये बघायला मिळते. नवरात्रीमध्ये तुम्हाला ९ दिवस वेगळा गुजरात पाहायला मिळेल. नवरात्रीमध्ये गरबा खेळण्याची परंपरा असून लोक वर्षानुवर्षे ती पाळत आहेत. गरबा किंवा दांडियाद्वारे लोक देवीला प्रसन्न करतात. गरबा/दांडिया एका खास पोशाखात साजरा केला जातो.

तामिळनाडू मधील नवरात्री</strong>

नवरात्रीच्या दरम्यान तुम्ही तामिळनाडूला भेट देण्याचा प्लॅन देखील करू शकता. येथे नवरात्री बोमाई गोलू किंवा नवरात्री गोलू म्हणून साजरी केली जाते. ज्यामध्ये येथे बनवलेल्या पारंपरिक बाहुल्या पाहायला मिळतात. या बाहुल्यांचा देखावा सजवला जातो. या वेळी लोक आपापल्या घरात दिवे लावतात आणि मंगल गीते गातात.

महाराष्ट्राची नवरात्री

नवरात्रीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही आपला महाराष्ट्र देखील फिरू शकता कारण इथेही नवरात्रीचे उत्सव मजेदार असतात. या दरम्यान महिला विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करतात.

केरळ मधील नवरात्री

केरळ एक असे ठिकाण आहे जिथे जाण्याचे जवळजवळ प्रत्येक प्रवाशाचे स्वप्न असते. त्यामुळे या काळात तुम्ही येथे जाण्याचाही विचार करू शकता. बहुतेक ठिकाणी नवरात्री नऊ दिवस साजरी केली जाते, तर केरळमध्ये ती फक्त शेवटचे तीन दिवस साजरी केली जाते. येथील लोक नवरात्रीत माँ सरस्वतीची पूजा करतात. असे मानले जाते की देवी सरस्वतीची पूजा केल्याने बुद्धी आणि बुद्धी प्राप्त होते.