Navratri 2022 : सर्वत्र जल्लोषात नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. नऊ दिवस भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. अनेकजण नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचा उपवास करतात. अशावेळी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवणे गरजेचे असते. शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही घरीच काही पेयं बनवू शकता. शरीराला ऊर्जा देणाऱ्या काही पेयांची रेसिपी जाणून घ्या.

बनाना शेक

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Use This Epsom Salt Looking Like Rice For Flower Plants Anant Mogra Jaswandi
Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
  • बनाना शेक बनवण्यासाठी केळी, दूध, साखर, ड्राय फ्रुट्स ही सामग्री लागते.
  • बनाना शेक बनवण्यासाठी सोललेली केळी मिक्सरच्या भांड्यात टाका.
  • त्यात थोडी साखर आणि अर्धा कप दूध घालून बारीक करा.
  • त्यानंतर तुमचे आवडते ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.
  • अशाप्रकारे बनाना शेक तयार करू शकता.

लस्सी

  • लस्सी बनवण्यासाठी दही, पाणी, साखर आणि उपवासाला चालणारे मीठ या सामग्रीची गरज आहे.
  • दह्याप्रमाणेच लस्सी पिण्यानेही आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
  • नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासादरम्यान तुम्ही शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी लस्सी पिऊ शकता.
  • लस्सी बनवण्यासाठी एका भांड्यात दही घ्या, त्या दह्यात मीठ किंवा साखर कोणतीही एक गोष्ट घालू शकता.
  • ते घातल्यानंतर ब्लेंडरच्या मदतीने बारीक करा. यानंतर लस्सी पिऊ शकता.

Navratri Diet Tips : मधूमेहाच्या रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासामध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

बदाम शेक

  • बदाम शेक बनवण्यासाठी वेलची, कस्टर्ड पावडर, दूध, बदाम, साखर या साहित्याची गरज आहे.
  • बदाम शेक बनवण्यासाठी दूध गरम करा..
  • या गरम दुधात कस्टर्ड पावडर आणि वेलची घालून हे दुध सुमारे १५ मिनिटे शिजवा.
  • यानंतर दुधात पावडर आणि साखर घाला.
  • आता शेक एका ग्लासमध्ये ओतून घ्या किंवा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)