Navratri 2026 Wishes In Marathi: नवरात्री हा भक्ती, उत्साह आणि आनंदाचा सण. या नऊ दिवसांत देवीची आराधना करून तिच्या आशीर्वादाची याचना केली जाते. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. यंदा नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून १९ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे आणि २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे.
पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नवरात्रीच्या काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीनिमित्त सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो. तुम्हाला नवरात्रोत्सवनिमित्त तुमच्या आप्तस्वकीयांना, प्रियजनांना शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही त्यांना खालील सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते ।
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

“नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला
शुभ नवरात्री!”
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता,
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः
शुभ नवरात्री…

नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
टिपऱ्या आणि टाळ्यांचा गजर,
आईच्या भक्तीचा जागर…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा…

आई दुर्गा, आई भवानी, आई जगदंबे, तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य… घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

नवा दीप उजळो,
नवी फुल उमलोत,
नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर
देवीचा आशिर्वाद राहो,
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
सर्व जग जिच्या शरणात आहे,
नमन त्या आईच्या चरणी आहे,
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ,
चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल,
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
