आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपल्याकडे देशभरात नऊ दिवसांचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुमच्यापैकी अनेक जण यावेळी नऊ दिवसांसाठी कडक उपवासही करत असतील आणि आजपासून अर्थात तुमच्या उपवासाला सुरुवातही झाली असेल. याचनिमित्ताने, आता आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहोत. ती अशी की, जर योग्य पद्धतींचा अवलंब केला तर उपवास हे तुम्हाला वजन कमी करण्यास मोठी मदत करू शकतो. होय, पण ‘योग्य पद्धतींचा अवलंब’ या शब्दांवर इथे अधिक भर आहे. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर नवरात्र हा तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की, उपवास करण्यामागे काही विशिष्ट वैज्ञानिक कारणं सांगितली जातात. उदा. उपवासामार्फत आपण आपल्या शरीराला नियमित अन्न खाण्यापासून थोडीशी विश्रांती देतो आणि त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. अनेक जण या दिवसांत फक्त फळं, दूध आणि पाणी इतक्याच पदार्थांचं सेवन करतात. पण प्रत्येकानेच असा उपवास करणं बंधनकारक नाही. मात्र, आपण खात असलेले इतर उपवासाचे अन्नपदार्थ हे पोषक घटकांनी समृद्ध असल्याची खात्री करणं निश्चितच महत्त्वाचं आहे. त्यामुळे, तुमची प्रकृती उत्तम राहते आणि सोबतच वजन घटवण्यासही मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri fasting best 5 simple tips for weight loss gst
First published on: 07-10-2021 at 19:01 IST