जे लोक वाढत्या वजनाने त्रस्त आहेत ते या नवरात्रीत उपवास करून आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शरीरातील तामस गोष्टींना काढून टाकण्यासाठी म्हणून हा ९ दिवसांचा उपवास भक्तांकडून केला जातो. मात्र, अनेकदा या उपवासामागील उदात्त हेतू मागेच टाकून केवळ वजन कमी करण्याच्या हेतूने ९ दिवसांचे उपवास पकडतात. पण काही जण गोड जास्त खाणे, फक्त तळलेले पदार्थ खाणे, चुकीचे खाल्ले गेल्याने वजन कमी होण्याच्या ऐवजी वाढते.

तुम्हाला जर नवरात्रीच्या उपवासाचे योग्य फायदे उचलायचे असतील तर काही चूका टाळणं गरजेचं आहे. तसंच तुमच्या डाएट प्लानमध्ये योग्य बदल करणे गरजेचे आहे. कारण नऊ दिवस उपवास करून शरीराला अतिरिक्त कॅलरीजपासून वाचवता येते. यासाठी नक्की काय खावेत आणि काय टाळावे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यासंदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. याचीच उत्तरं देण्यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ञ रजत जैन यांनी यासाठी नवरात्रीतल्या उपवासाबाबत खास टिप्स दिल्या आहेत.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

उपवासामुळे वजन कमी होतं की कमजोरी वाढते ?

होय, जर तुम्ही उपवासा दरम्यान शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची पूर्तता करणारा डाएट प्लान व्यवस्थितपणे पाळलं तर तुमचं वजन कमी तर होईलच पण अशक्तपणा पण येणार नाही. यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे अशा सर्व घटकांनीयुक्त चौरस आहार मिळतोय ना याची खात्री करुन घ्या. उपवासादरम्यान बरेज जण आरोग्यास बाधक असे अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणावर खातात. तेलकट पुऱ्या, भजी-पकोडा, चीप्स इत्यादी. असे पदार्थ खाणं बिलकूल टाळा. कारण उपवासाच्या मूळ संकल्पनेच्या विरोधात जाणारे हे पदार्थ आहेत. याऐवजी साबुदाणा खिचडी, वरई, चणे, बटाटा इत्यादींचे सेवन करा. यांच्या सेवनाने वजन तर वाढणार नाही. मात्र शरीराला आवश्यक ते घटक पुरेशा प्रमाणात मिळतील.

उपवासादरम्यान खाण्यायोग्य पदार्थ शरीराला अनुकूल आहे का?

शेंगदाणे, साबुदाणा आणि फळांवर आधारित मिठाई सारखे पदार्थ, आणि तूप हे पदार्थ सर्व आहारामध्ये समतोल साधण्यासाठी पुरेसे आहेत. तसंच या शुध्द शाकाहारी साध्या भोजन पद्धतीला हानीकारक असल्याची शंका कोण घेईल?

उपवासाच्या आहारातून पुरेसे पोषक कसे मिळवायचे?

कार्बोहायड्रेटसाठी तुम्ही साबुदाणा, शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, भाजलेले शेंगदाणे, चिवडा इत्यादी पदार्थ घेऊ शकता. प्रथिनांसाठी दुग्धजन्य पदार्थ उदाहरणार्थ दूध, पनीर हे उत्तम पर्याय आहेत.

निरोगी चरबी वाढवण्यासाठी तुम्ही तुप वापरून तुमचे सर्व पदार्थ शिजवू शकता. तसंच जीवनसत्त्वे आणि खनिजांसाठी आपण फळे आणि भाज्या घेऊ शकता. उपवासादरम्यान आपण खाऊ शकतो आणि त्यातून पोषक घटकही मिळू शकतात अशा अनेक पदार्थामधून आपण आपला डाएट संतुलिंत ठेवू शकतो. जर तुम्ही वजनाच्या बाबतीत जागरूक असाल तर तुम्ही कमी साखर घ्यावी. त्यामुळे उपवासादरम्यान जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा.

उपवास करताना भूक कशी भागवावी?

ज्यांना सकाळी भुक लागते आणि नाश्ता करायला आवडतो त्यांच्यासाठी ह्या पद्धतीची सवय लावणे जरा कठीण होऊ शकते. तुम्ही उपवास करताना पाणी, ज्यूस आणि इतर शून्य-कॅलरीयुक्त पेये पिऊ शकता, म्हणजे तुम्हाला भूक भूक होणार नाही. प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रथिने तुम्हाला भूक दूर करण्यास मदत करतात आणि तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी तृप्त करतात. तसंच वजन कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.

प्रथिने मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ शकतो ?

दूध आणि दुधापासून बनवलेले इतर पदार्थ यामध्ये प्रथिने असतात आणि उपवास करताना देखील ते वापरले जाऊ शकतात. प्रथिनेयुक्त आहारासाठी तुम्ही पनीर, दूध, ताक, लस्सी इत्यादी घेऊ शकता. यासह, बदाम, फ्लेक्ससीड्स, भोपळ्याच्या बिया तसंच काजूमध्ये काही प्रमाणात प्रथिने देखील असतात.

उपवासाने शरीरावर नकारात्मक परिणाम होईल का?

तुम्हाला वाटत असेल की ठराविक दिवसांसाठी आहारात बदल केल्याने तुमच्या आहार किंवा फिटनेसवर थोड्या फार परिणाम होऊ शकतो. परंतु जर तुम्ही जर सातत्याने शरीराला योग्य पोषकद्रव्ये देत असाल आणि तुमच्या शरीराला थोडासा ब्रेक दिला तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. या दिवसात तुम्हाला याबाबत अनेक गैरसमज ऐकायला ही मिळतील.