माउंट एव्हरेस्टनंतर पाच वर्षांनी आता नेपाळ सरकारने देशभरात सोलो ट्रेकिंगवर बंदी घातली आहे. नेपाळमधील पर्वतांवर पर्यटक आणि पर्वतप्रेमींचा मोठा ओघ दिसतो जे आश्चर्यकारकपणे हिमालयातील शिखरे सर करतात. नेपाळ टुरिस्ट बोर्डाने (NTB) घेतलेला हा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रेकिंगसाठी ओळखले जाते नेपाळ

kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?

नेपाळमध्ये जगातील आठ उंच पर्वत आहेत आणि ते ग्रामीण भागातील सुंदर ट्रेकिंग क्षेत्रांसाठी देखील ओळखले जाते. आता, ज्यांना दुर्गम भागात ट्रेक करायचा आहे त्यांनी सरकारी परवाना असलेल्या मार्गदर्शकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे किंवा गटात सामील होणे आवश्यक आहे.

ट्रेकिंग हा नेपाळचा सर्वात मोठा उत्पन्नाचा आहे स्त्रोत

नेपाळचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत पर्यटन आहे, विशेषतः ट्रेकिंगमधून. पण शोध-आणि-बचाव मोहिमेचा खर्च देशाला प्रत्येक वेळी करावा लागतो.एकट्या फिरताना हरवलेल्या गिर्यारोहकाला शोधण्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागतो.

नेपाळमध्ये सोलो ट्रेकिंगवर बंदी

नेपाळ टुरिझम बोर्डाचे प्रभारी मणिआर लामिछाने यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जर तुम्ही एकटे ट्रेकिंग करत असाल तर तुम्हाला मदत करायला कोणी नसेल. लामिछाने यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा पर्यटक बेपत्ता होतात किंवा मृत आढळतात, तेव्हा ते दूरस्थ मार्गाने जातात म्हणून सरकारही त्यांना शोधू शकत नाही”.

बालीमध्ये बाईक चालविण्यास किंवा भाड्याने घेण्यास पर्यटकांवर का घातली जातेय बंदी; जाणून घ्या

नेपाळमध्ये पर्यटकांसाठी TIMS कार्ड अनिवार्य

नेपाळ टुरिस्ट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये सुमारे 50,000 पर्यटकांनी नेपाळमध्ये मार्गदर्शक किंवा कुलीशिवाय प्रवास केला. या पर्यटकांनी मार्ग परमिट तसेच ट्रेकर्स इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम (TIMS) कार्ड मिळवून ट्रेकिंग केले.

साहसी पर्यटन करणार्‍या परदेशी पर्यटकांसाठी TIMS कार्ड हे अधिकृत ट्रेकिंग परमिट आहे. परंतु नियमांच्या नवीनतम फेरीने मार्गदर्शकाशिवाय TIMS परवानग्या थांबवल्या आहेत. लामिछाने म्हणाले की, “पर्यटकांना ट्रेकिंग कंपनीच्या माध्यमातून ट्रेक करावे लागते.

बोर्डाने TIMS परमिटची किंमतही प्रति व्यक्ती २००० रुपये केली आहे. यापूर्वी, मोठ्या गटात प्रवास करणाऱ्यांना TIMS कार्डसाठी १००० रुपये मोजावे लागत होते, तर एकट्याने प्रवास करणाऱ्यांना २००० रुपये मोजावे लागत होते. सार्क नागरिकांसाठी TIMS परवाना देखील 1,000 रुपये करण्यात आला आहे.