Never Eat These Foods with Mangoes: उन्हाळा आला की सगळ्यांच्या आवडीचं एक खास फळ म्हणजे आंबा. आंब्याशिवाय उन्हाळा अपूर्ण आहे. आंबे खायला आवडत नाहीत अशी व्यक्ती क्वचितच बघायला मिळेल? उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आंब्याचा रस बहुतेकांची आवड असतेच. आंब्यामध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात. आंबा केवळ चवदार, रसाळ आणि गोडसरच नाही तर पोषणमूल्यांनी भरलेले एक अमृततुल्य फळ मानले जाते. आंब्याला मागणीदेखील फार मोठ्या प्रमाणात असते. प्रत्येक जण आंबा खाण्यासाठी उत्सुक असतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आंबा प्रचंड आवडतो. मात्र, हा आंबा खाल्यानंतर काही गोष्टी खाल्ल्यास तो अमृत न राहता विषासारखा धोकादायक ठरू शकतो, असा इशारा डायटीशियन आइना सिंघल यांनी दिलाय. आंबा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नये, जाणून घेऊया…

आंब्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आंबा हा व्हिटॅमिन A, C, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो. तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीराला थंडावा देतो. परंतु, आंबा खाल्ल्यानंतर काही अन्नपदार्थ खाल्यास शरीरात उलट प्रक्रिया होऊ शकतात. पचनतंत्र बिघडू शकतं, ॲलर्जी, अपचन, गॅस किंवा त्वचेचे त्रासदेखील उद्भवू शकतात, असे सिंघल यांचे म्हणणे आहे. चला तर जाणून घेऊया आंबे खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत.

आंबे खाल्ल्यानंतर कधीही ‘या’ गोष्टी खाऊ नका!

दही : अनेकांना मँगो लस्सी किंवा मँगो शेक खायला आवडतो. पण, आंबा आणि दही हे दोघंही पचनात अडथळा आणू शकतात; त्यामुळे सर्दी, खोकला आणि श्वासाचे त्रास वाढू शकतात. हे खायचंच असेल तर वेगवेगळ्या वेळेला घ्या.

आंबट पदार्थ : आंबे खाल्यानंतर आंबट गोष्टी खाल्ल्यास पोटात आम्लता वाढते. त्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, उलटी यांसारखे त्रास होऊ शकतात.

दूध : मँगो शेकसाठी आंबा आणि दूध एकत्र करतात, पण दूध थंड तर आंबा गरम, त्यामुळे दोघांचे मिश्रण पचनासाठी घातक ठरू शकते.

मसालेदार अन्न : जेवणात काहीतरी तिखट-तेलकट खाल्ल्यानंतर लगेच आंबा खाल्ल्यास पोटात जळजळ, अपचन, होण्याचा मोठा धोका असतो.

पाणी : अनेक जण आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात, पण हे टाळावं. आंब्यानंतर पाणी प्यायल्यास डायरिया आणि पाचनतंत्र बिघडण्याची शक्यता वाढते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढच्या वेळी आंबा खाण्याआधी या पाच गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर आंबा तुमच्या आरोग्याचा शत्रू ठरू शकतो.