new covid like virus khosta 2 found in russian bat | Loksatta

रशियातील वटवाघुळात आढळला ‘हा’ Covid सारखा विषाणू, त्यावर लसीचाही प्रभाव नाही

एका पक्षामध्ये कोरोना विषाणू scov2 सारखाच प्राणघातक विषाणू आढळल्याचे संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे यावर कोरोनावर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या लसीचाही परिणाम होत नसल्याचे सागंण्यात आले आहे.

रशियातील वटवाघुळात आढळला ‘हा’ Covid सारखा विषाणू, त्यावर लसीचाही प्रभाव नाही
वटवाघूळ (pic credit – pexels)

कोरोनाने संपूर्ण जगात उद्रेक केला होता. अनेक लोकांचा या धोकादायक विषाणूमुळे जीव गेला. गेल्या तीन वर्षांपासून नागरिक कोरोना संकटाच्या सावटाखाली वावरत आहेत. अशात पुन्हा एक धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. एका पक्षामध्ये कोरोना विषाणू scov 2 सारखाच विषाणू आढळल्याचे संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, यावर कोरोनावर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या लसीचाही परिणाम होत नसल्याचे सागंण्यात आले आहे.

या प्राण्यात आढळला विषाणू

वटवाघुळात khosta 2 नावाचा विषाणू आढळून आला आहे. याचा संसर्ग कोरोना विषाणू सारखा आहे. विशष म्हणजे, यावर कोरोनाच्या लसीचा प्रभाव होत नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. हा विषाणू रशियामध्ये आढळून आला आहे. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हरसिटीच्या शंशोधनकर्त्यांच्या एका गटाने हा अभ्यास केला आहे. वटवाघुळात मिळालेल्या खोस्टा २ विषाणूमध्ये स्पाईक प्रथिने आढळून आली आहेत, जी मानवी पेशींना संक्रमित करू शकतात, तसेच ते कोविडची लस घेतलेल्या लोकांकडून ब्लड सिरम घेण्याची पद्धत आणि अँटिबॉडी थेरेपीला प्रतिरोध करतात.

(या उपायांनी केळीसह ‘हे’ 5 पदार्थ अधिक काळ टिकू शकतात, जाणून घ्या)

लसीकरण मोहिमेला धोका निर्माण करू शकतो

कुठलाही विषाणू मानव पेशींमध्ये शिरण्यासाठी स्पाईक प्रथिन्यांचा वापर करतो. खोस्टा २ आणि सार्सकोव २ हे दोन्ही कोरोना विषाणूची उपश्रेणी सर्बोकोवायरसमध्ये येतात. संशोधनाचे लेखक माइकल लेतको यांनी चिंता व्यक्त केली आहे. आमचे संशोधन हे ही सांगते की आशिया बाहेरील वन्यजिवांमध्ये मिळणारे सर्बोकोवायरस जागतिक आरोग्यासाठी आणि सार्सकोव – २ विरुद्ध असलेल्या लसीकरण मोहिमेला धोका निर्माण करणारे आहेत. पश्चिम रशियामध्ये खोस्टा २ आढळून आलेला आहे, अशी माहिती माइकल लेतको यांनी दिली.

सध्या आपल्याला माहित असलेल्या विषाणूंवरच लस

पीएलओएस पॅथोजन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेला आभ्यासामध्ये असे सांगण्यात आले आहे की, सार्सकोव २ च्या केवळ ज्ञात प्रकारांऐवजी सर्बोकोवायरसविरुद्ध सुरक्षा देणाऱ्या जागतिक लसीचा विकास करणे देखील गरजेचे आहे. लेतको यांनी माहिती दिली की, यावेळी काही गट केवळ सार्सकोवच नव्हे तर सर्बकोवायरसपासून सुरक्षा देणाऱ्या लसी विकसित करण्यावर काम करत आहेत. मात्र दुर्दैवाने सध्या उपलब्ध असलेल्या बऱ्याच लसी विशिष्ट विषाणूंसाठी बनवलेल्या आहेत. विशेषत: आपल्याला माहिती असलेल्या विषाणूंसाठीच त्या लसी बनवण्यात आल्या आहेत, असे लेतको म्हणाले.

(Late periods : मासिक पाळी उशिरा येण्यामागे ‘ही’ ३ कारणे असू शकतात, जाणून घ्या)

तर हा विषाणू अधिक धोकादायक होईल

हा नवा विषाणू भविष्यात महामारीचे स्वरूप घेऊ शकतो, अशी चिंता लेतको यांनी व्यक्त केली. तसेच जर हा विषाणू कोरोना विषाणूसोबत मिळाला तर संसर्ग अधिक धोकादायक होऊ शकतो, मात्र दोन्ही विषाणूंची एकत्र होण्याची शक्यता कमी असल्याचे लेतको म्हणाले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवरात्रौत्सवात गरबा खेळून करा वजन कमी; सोबतच मिळतील ‘हे’ इतर मोठे फायदे…

संबंधित बातम्या

मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या
लिंबाच्या सालीचे फायदे ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या काय आहेत फायदे
तुमच्या कॉफीला द्या भन्नाट ट्विस्ट! ‘या’ आहेत ३ स्वादिष्ट रेसिपीज

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा
पुणे: कोथरुड भागात गांजा विक्री एकास अटक; साडेसात किलो गांजा जप्त