scorecardresearch

सोरायसिसवर नवे औषध बाजारात

सोरायसिस रोगात पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व इतर आव्हाने आहेत.

सोरायसिसवर नवे औषध बाजारात
(फोटो सौजन्य – Pixabay)

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने सोरायसिस या आजारावरील उपचारांसाठी अप्रेमिलास्ट हे औषध बाजारात आणले आहे.

अ‍ॅप्रेमिलास्ट हे औषध म्हणजे फॉस्फोडिस्टेरेज ४ प्रतिबंधक असून त्यामुळे सोरायसिसच्या उपचारात मोठी प्रगती होत आहे, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने म्हटले आहे. ३.३० कोटी लोकांना देशात या रोगाची लागण झालेली असून मुंबईच्या ग्लेनमार्क कंपनीने अ‍ॅप्रेमिलास्ट हे औषध अ‍ॅप्रेझो नावाने आणले आहे त्यासाठी औषध नियंत्रकांची परवानगी घेतली आहे. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्याही झाल्या आहेत.

या औषधाने सोरायसिस उपचारात बदल घडून येतील असे या कंपनीचे भारत, मध्यपूर्व व आफ्रिका विभागाचे प्रमुख सुजेश वासुदेवन यांनी सांगितले. सोरायसिस रोगात पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व इतर आव्हाने आहेत.

अ‍ॅप्रेमिलास्ट हे औषध सुरक्षित असून तोंडावाटे घेतले जाते त्यासाठी प्रयोगशाळा निरीक्षण व पॅरामेडिकल मदतीची गरज नाही असे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2017 at 03:56 IST

संबंधित बातम्या