ख्रिसमस आणि नवीन वर्षाची संधी साधत कंपन्या आपल्या नवनवीन ऑफर्स जाहीर करतात. मागील काही काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून इंटरनेट कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत आहेत. आताही व्होडाफोनने नव्या दोन प्लॅनची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. रिलायन्स जिओने ‘हॅप्पी न्यू ईयर २०१८ प्लॅन’ची घोषणा केल्यानंतर लगेचच व्होडाफोनने आपले प्लॅन जाहीर करत जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्होडाफोनच्या नव्या १९८च्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० मेसेज आणि दररोज १ जीबी ३जी किंवा ४ जीडेटा मिळणार आहे. व्होडाफोनचा हा प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी असेल असे कंपनीने सांगितले आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल. याबरोबरच कंपनीने २२९ रुपयांचा आणखी एक प्लॅन कंपनीने आणला आहे. या प्लॅनमध्येही १९८ च्या प्लॅनप्रमाणेच सुविधा मिळतील. मात्र यामध्ये १ जीबी डेटाऐवजी दररोज २ जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच महिन्याला ग्राहकांना ५६ जीबी डेटा मिळणार आहे.

नुकतेच जिओनेही आपले स्वस्तात मस्त असे प्लॅन लाँच केले आहेत. १९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि SMS ची सुविधा देण्यात आली आहे. याबरोबरच दररोज १.२ जीबी 4G डेटा मिळेल. लिमीट संपल्यानंतरही ग्राहकांना डेटा मिळत राहील. मात्र त्याचा स्पीड 4G नसून कमी असेल. याशिवाय ज्यांना जास्त इंटरनेटची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी कंपनीने २९८ रुपयांचा आणखी एक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये २८ दिवसांसाठी रोज २ जीबी 4G डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉल आणि SMS ची सुविधा मिळणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New plans of vodafone for new year internet offer
First published on: 25-12-2017 at 15:47 IST