डोळ्यांच्या आजारांसाठी नवीन चाचणी

ऑस्ट्रेलियाच्या व्हिजन सेंटरने डोळ्यांच्या विकाराबाबत व्यापक संशोधन केले आहे.

दृष्टी अधू होणे, डोळ्यातून पाणी येणे, धुरकट दिसणे, मोतीबिंदू आदी बाबींचा समावेश असतो. डोळ्यांच्या वयोमानानुसार होणा-या विकाराबाबतची माहिती देणारी नवीन चाचणी संशोधकांनी शोधून काढली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या व्हिजन सेंटरने डोळ्यांच्या विकाराबाबत व्यापक संशोधन केले आहे. या चाचणीनुसार एखाद्या व्यक्तीला भविष्यात होणा-या डोळ्यांच्या विकारांची माहिती मिळू शकते. सध्याच्या चाचण्यांमध्ये ही सोय उपलब्ध नाही. डोळ्याला भविष्यात कोणता विकार होऊ शकतो, याची जाणीव संबंधित व्यक्तीला डॉक्टर करून देतात. पूर्ण अंधत्व टाळण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती दिली जाते. व्यक्तीचे वय वाढू लागल्यानंतर नेत्रपटलाभोवती मोतीबिंदू आकार घेऊ लागते. मात्र यामुळे डोळ्यांचे विकार होतील याची खात्री देता येत नाही. मात्र, डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता वाढू शकते, असे ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठातील प्राध्यापक टेड मॅडेस यांनी सांगितले.
डोळ्यातील पांढरा भाग प्रसरण व आंकुचन पावणे आणि डोळ्याच्या पडद्याला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या पेशी मृतवत होणे आदी प्रकार घडतात. त्यामुळे डोळ्यातील रक्तवाहिन्यांची अवास्तव वाढ होते. यामुळे दृष्टीसाठी उपयुक्त ठरणारी मध्यवर्ती दृष्टी यंत्रणा खराब होते. ही नवीन चाचणी मध्यवर्ती दृष्टी यंत्रणेवर सर्व लक्ष केंद्रित करते.
यासाठी लागणारे नवीन मशिन मॅडेस यांच्या गटाने आणि ऑस्ट्रेलियन कंपनी ‘सीइंग मशिन’ने विकसित केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिक्षेपात येणा-या ठिकाणांची माहिती नोंदवली जाते. तसेच डोळ्यातील बुब्बुळांची हालचाल इन्फ्रारेड लायटिंगच्या सहाय्याने नोंदवली जाते. त्यानंतर या माहितीचे विश्लेषण संगणकाद्वारे केले जाते. या नवीन चाचणीमुळे डॉक्टर व रुग्णांना धोक्याचा इशारा मिळू शकतो, असे मॅडेस यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New treatment found for eye disease

ताज्या बातम्या