पॉर्न पाहत असाल तर सावधान ! रेकॉर्ड होतोय तुमचा व्हिडिओ

तुमच्या नकळत रेकॉर्ड होतोय तुमचा व्हिडिओ

तुम्हीही इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ पाहत असाल तर आता वेळीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण, अशाप्रकारचे व्हिडिओ बघताना तुमच्या नकळत तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी ‘स्पॅमबॉट’ शोधलाय. हा एकप्रकारचा प्रोग्रॅम असून Varenyky असं या स्पॅमबॉटचं नाव आहे. सर्वप्रथम फ्रान्सच्या तज्ज्ञांनी या बॉटचा शोध लावला आहे. हॅकर्स या बॉटच्या मदतीने युजर्सच्या कंम्प्युटरचा अॅक्सेस मिळवतात. याद्वारे युजर्स पॉर्न बघत असताना युजर्सचं चित्रीकरण केलं जातं. नंतर याच चित्रीकरणाचा वापर हॅकर्सद्वारे युजर्सना ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो.

चित्रीकरण केल्यानंतर युजरला एक मेल पाठवला जातो. या मेलमधून युजरला पॉर्न पाहत असताना रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओबाबत कल्पना दिली जाते, तसंच अन्य खासगी महत्त्वाची माहितीही उपलब्ध असल्याचा दावा केला जातो आणि खंडणीची मागणी केली जाते. खंडणीची रक्कम ७२ तासांच्या आत जमा केली नाही, किंवा पासवर्ड अथवा व्हायरस डिलीट करण्याचा प्रयत्न केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची, तसेच तुमच्या जवळच्या सहा व्यक्तींना पाठवण्याची धमकी दिली जाते.

अद्याप अशा प्रकरणांमध्ये किंवा इमेलमध्ये केलेल्या दाव्यांबाबत सबळ पुरावा समोर आला नाहीये. पण Varenyky व्हायरस युजर्सच्या कंप्युटरची स्क्रीन रेकॉर्ड करु शकतो. त्यामुळे युजर्स स्क्रीनवर काय बघत आहेत हे रेकॉर्ड होण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी वेळीच योग्य ती सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही फेक सॉर्सकडून आलेली फाईल किंवा अटॅचमेंट डाउनलोड करु नये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New virus starts recording when you visit porn website sas

ताज्या बातम्या