Happy New Year 2026 Wishes : बघता बघता २०२६ वर्ष संपले, हे वर्ष कधी आले कधी गेले हे कळलेच नाही. सुखाच्या दुःखाच्या, आनंदाच्या, विरहाच्या अनेक आठवणी ठेऊन हे वर्ष निघून गेले. नवे वर्ष म्हटल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागण्याचा संकल्प तुम्ही केला असेल.नवीन वर्षाची सुरुवात जितकी चांगली आणि उत्साहपूर्ण असेल तितकेच संपूर्ण वर्ष चांगले जाईल. हे वर्ष जास्तीत जास्त आनंदाने, प्रियजनांच्या सहसावात, प्रगती आणि भरभराटीने जावे अशी सर्वांची इच्छा असते. सरत्या वर्षाची संध्याकाळ आणि नवीन वर्षाची पहाट आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत कुणाला घालवायला आवडणार नाही. त्या दृष्टीने बहुतेक जण नियोजन पण करीत असतील परंतु ज्यांच्या काही जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून दूर देखील राहत असतील. त्यांना आपण फोनकरुन किंवा एसएमएस करुन शुभेच्छा देणे अगत्याचे आहे. मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊन त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अढळ आहे असे आपण जरुर सांगू शकतो.अशा सर्व नातेवाईक, मित्रांना शुभेच्छा पाठवा आणि तुमच्या जीवनात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे याची जाणीव करुन द्या.

मित्र-नातेवाईकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीतील खास Whatsapp Messages, हटके HD फोटो, Status

नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे,

आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!

नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,

सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना!

सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना,

नव्या वर्षात पूर्ण होऊ दे अधुरी ही कहाणी,

हीच प्रार्थना होऊन नतमस्तक,

गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा,

Happy New Year 2026

हे नातं सदैव असंच राहो,

मनात आठवणींचे दिवे कायम राहो,

खूप प्रेमळ होता 2026 चा प्रवास,

अशीच राहो 2026 मध्येही आपली साथ

Happy New Year 2026

नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात,

या वर्षात उजळून जाऊदे भाग्याची ही रेषा,

परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास,

तुमच्या उपस्थितीने लखलखुदे हे जीवन आज,

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2026

पाकळी-पाकळी भिजावी,

अलवार त्या दवाने,

फुलांचेही व्हावे गाणे,

असे जावो वर्ष नवे,

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2026

हे नववर्ष तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी,

आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी,

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2026

नववर्षाच्या द्या मराठीतून या खास शुभेच्छा, पहा New Year Wishes Images, Whatsaap Messages Quotes in Marathi

येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख-समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवे वर्ष म्हणजे नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, नव्या योजना, नवे संकल्प..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

चला या नव वर्षाचं स्वागत करुया जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

गेला तो काळ आणि गेलं ते वर्ष आता नव्या आशा-अपेक्षा घेऊन आले २०२६ वर्ष

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

३१ तारखेला फक्त मजा करा अन् नवीन वर्षात

भरपूर काम करा…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,

होतील मनातील पूर्ण इच्छा

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या कुटुंबासाठी २०२६ हे वर्ष खास असो

संपूर्ण घर आनंदाने नांदत राहो तुमच्या प्रगतीसाठी नवी दारं उघडो

आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वी ठरो. नववर्षाभिनंदन!

इडा, पिडा टळू दे आणि नवीन वर्षात माझ्या मित्रांना काय हवं ते मिळू दे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!