scorecardresearch

चहाप्रेमींची काळजी वाढवणारी बातमी! संध्याकाळचा चहा पिणं ठरू शकतं हानिकारक? कसं ते जाणून घ्या

अनेक लोक सकाळी आणि संध्याकाळी चहा पिण्याला प्राधान्य देस असल्याचं सर्वसाधारणपणे दिसून येतं

Is it OK to drink tea in the evening
अनेकजण चहाचे असे शौकीन असतात, ज्यांना चहा पिल्याशिवाय करमत नाही किंवा कामात मन लागत नाही. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टिम)

देशात चहाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्यापैकी अनेकजण चहाचे असे शौकीन आहेत, ज्यांना चहा पिल्याशिवाय करमत नाही किंवा कामात मन लागत नाही. त्यामुळेच आता शहरांमध्ये दिवसेंदिवस चहा विक्रेत्यांची सख्या वाढत आहे. अनेक लोकांना विशेषतः दुधाचा चहा खूप आवडतो. सकाळीच नव्हे तर ते दिवसात खूप वेळा चहा पित असतात.

अनेक लोक सकाळी आणि संध्याकाळी चहा पिण्याला प्राधान्य देस असल्याचं सर्वसाधारणपणे दिसून येते. पण या चहा प्रेमींची काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे संध्याकाळी चहा पिण्याते शरीरावर काही हानिकारक परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार सावलिया यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की सुमारे ६४ टक्के भारतीय लोक रोज चहा पितात. त्यापैकी ३० टक्के लोक संध्याकाळी चहा पितात. मात्र, संध्याकाळचा चहा पिण्याचे काही तोटे आहेत.

हेही वाचा- Lung Cancer: ‘या’ कारणांमुळे धूम्रपान न करणाऱ्यांनाही होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग; कसा ते जाणून घ्या

संध्याकाळी चहा पिण्याचे तोटे –

डॉ. दीक्षा भावसार सावलिया सांगतात, ‘वैद्यकीयशास्त्रानुसार चांगली झोप, चांगले यकृत डिटॉक्स, कमी कॉर्टिसॉल (दाह) आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी झोपण्याआधी १० तास कॅफिनचे सेवन करणं टाळावे.’ चहामध्ये कॅफिन असते, जे हानी पोहोचवू शकते. BHMS पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ डॉ. स्मृती झुनझुनवाला यांनी सांगितले की, चहा पिणे वाईट नाही. पण भारतातील लोक दुधासोबत चहा पितात, त्यामुळे चहामध्ये असलेल्या अनेक आवश्यक घटकांची शक्ती कमी होते.

हेही वाचा- तुम्हालाही वारंवार लघवी होते का? तर हाय सोडियम बनवतंय तुमच्या रक्तामध्ये पाणी, लगेच करा ‘या’ पदार्थांचे सेवन

संध्याकाळी ‘हे’ लोक चहा पिऊ शकतात –

  • नाईट शिफ्टला काम करणारे.
  • ज्यांना गॅस आणि ऍसिडिटी होत नाही.
  • पचन प्रक्रिया चांगली असलेले.
  • ज्यांना चांगली झोप येते.
  • वेळेवर जेवणारे.

शिवाय जे दिवसातून फक्त एकदाच चहा पितात ते संध्याकाळी एकाच वेळी चहा पिऊ शकतात. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा सांगतात की, वर उल्लेख केलेल्या लोकांनी संध्याकाळी पिल्याने त्यांच्या शरीराला फारशी हानी होत नाही.

(टीप: वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित असून गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 12:41 IST