Night Skin Care Routine: दिवसभरात आपली त्वचा सूर्यप्रकाश, धूळ, माती, प्रदूषणाच्या संपर्कात येते, त्यामुळे ‘नाईट स्किन केअर’ (Night Skin Care) करणे अत्यंत गरजेचे ठरते. बहुतेक लोक सकाळी तर त्वचेची काळजी घेतात, पण रात्री स्किन केअर रूटीन फॉलो करत नाहीत. यामुळे चेहऱ्यावर फक्त पुरळ येण्याचीच समस्या उद्भवत नाही, तर सकाळी चेहरा निस्तेज दिसू लागतो. तसंच अकाली वृद्धत्व म्हणजेच सुरकुत्या आणि बारीक रेषा येण्याची समस्याही निर्माण होऊ शकते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रात्री काय करायला हवे, ते जाणून घेऊया.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराबरोबरच भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. यासह त्वचेची बाह्य काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमची त्वचा हेल्दी ठेवू शकता:

१. डबल क्लिंजिंग (Double Cleansing) नक्की करा

रात्री डबल क्लिंजिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. ही स्टेप अजिबात मिस करू नका. विशेषतः जर तुम्ही मेकअप केला असेल, तर चेहरा स्वच्छ केल्याशिवाय कधीही झोपू नका. आधी फेस वॉशने चेहरा धुवा आणि नंतर कापसाच्या (Cotton) मदतीने क्लिन्झरने चेहरा पूर्णपणे साफ करा.

२. चेहऱ्याला टोन (Toning) करा

त्वचा टोन करणे देखील महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचेचा pH स्तर संतुलित राहतो. यासाठी महागडे टोनर खरेदी करण्याची गरज नाही; तुम्ही गुलाब पाण्याचा (Rose Water) वापर करू शकता. कापसावर गुलाब पाणी घेऊन चेहऱ्यावर लावा किंवा स्प्रे करून कोरडे होऊ द्या.

३. चेहऱ्याला मॉइश्चराइज करा

क्लिंजिंगनंतर त्वचा कोरडी होते, त्यामुळे चेहरा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे ही दुसरी महत्त्वाची पायरी आहे. यासाठी कोणतेही हलके (Lightweight) मॉइश्चरायझर निवडा. ॲक्टिव्ह कंपाउंड्स असलेले मॉइश्चरायझर वापरण्याचा प्रयत्न करा.

४. डोळ्यांना आराम देणे गरजेचे

दिवसभरात आपले डोळे खूप थकतात, ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर डोळ्यांखाली सूज (Puffiness) दिसते आणि हळूहळू काळी वर्तुळे (Dark Circles) तयार होतात. रात्री किसलेला काकडीचा किस डोळ्यांवर काही वेळ ठेवा किंवा अंडर-आय क्रीम, अंडर-आय मास्क किंवा आइस पॅकचा वापर करा.

५. लिप बाम (Lip Balm) लावायला विसरू नका

अनेकदा लोक चेहऱ्याची काळजी घेतात पण लिप बाम लावायला विसरतात. ओठांची त्वचा खूप नाजूक असते आणि त्यात नैसर्गिक ऑइल ग्लँड्स नसतात. यामुळेच ओठ लवकर कोरडे पडतात आणि त्यांचा रंग काळवंडू लागतो. त्यामुळे रात्री झोपताना एखादा चांगला हायड्रेटिंग लिप बाम नक्की लावा.

(टीप – चेहऱ्यावर कोणतीही क्रीम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)