रात्री वारंवार लघवी येत असल्यामुळे तुमची झोपही विस्कळीत होते का? वैद्यकीय भाषेत, रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागण्याच्या समस्येला नॉक्चुरिया (Nocturia), असे म्हणतात. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते किंवा तुमचा चुकीचा आहार आणि जीवनशैली यांचा विपरीत परिणाम असू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरेसे पाणी पिऊन आणि योग्य आहार घेऊन या स्थितीत बरीच सुधारणा होऊ शकते. भारतीय योगगुरू, लेखक, संशोधक व टीव्ही व्यक्तिमत्त्व डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागण्याच्या सुमारे ९० टक्के प्रकरणांमध्ये ही समस्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमधील बदलांमुळे उद्भवते.
रात्री लघवीसाठी वारंवार जाग आल्याने झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि ही समस्या दीर्घकाळ टिकल्यास दिवसभर थकवा आणि सुस्ती येऊ शकते. त्याची अनेक कारणे आहेत, त्यामुळे केवळ आहारात बदल करणे हाच त्यावरचा उपाय मानला जाऊ शकत नाही.
आयुर्वेदिक आणि युनानी औषधशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी सांगतात की, काही फळांमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मूत्राशयाचे आरोग्य राखण्यास मदत करू शकतात. वारंवार लघवी का येते आणि कोणती फळे ही समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात, हे तज्ञांकडून जाणून घेऊया.
रात्री वारंवार लघवी येण्याची कारणे काय असू शकतात?
नॉक्चुरियाची अनेक कारणे असू शकतात. काही लोकांमध्ये, शरीर रात्रीच्या वेळी गरजेपेक्षा जास्त मूत्र तयार करते, या स्थितीला नॉक्चर्नल पॉलीयुरिया, असे म्हणतात. अतिसक्रिय मूत्राशयामुळे मूत्र थोड्या वेळासाठी रोखून धरले तरीही लघवी करण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. पुरुषांमध्ये बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया (BPH) म्हणजेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ, हे एक सामान्य कारण आहे. मधुमेह, संध्याकाळी गरजेपेक्षा जास्त द्रवपदार्थ सेवन आणि इतर आरोग्य समस्यांमुळेही रात्री वारंवार लघवी होऊ शकते.
असू शकतात ‘हे’ आजार
मधुमेह
रात्री वारंवार लघवीला जाणे हे मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण आहे. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यामुळे किडनीवर ताण येतो आणि त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. मधुमेहामुळे शरीरातील इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा शरीर इन्सुलिनला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
मूतखडा
मूत्रपिंडांच्या आजारांमुळेदेखील रात्री वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवू शकते. मूत्रपिंडातील दगड किंवा ???मूत्रपिंडांमध्ये (की- मूत्रपिंडांशी संबंधित)??? इतर कोणतेही आजार असतील, तर मूत्र तयार होण्याची प्रक्रिया बाधित होते. अशा परिस्थितीत रात्री वारंवार लघवीला जावे लागते
लघवीच्या समस्यांवर उपयुक्त फळे
केळी खा
केळी हे कमी आम्ल असलेले फळ असून, त्यात फायबर आणि पोटॅशियम असते. नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणासोबत त्यांचे माफक प्रमाणात सेवन केले जाऊ शकते. तथापि, मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी पोटॅशियमच्या सेवनाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ (NIH)नुसार, शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची कमी पातळी स्नायू आणि मूत्राशयाच्या नियंत्रणावर परिणाम करू शकते.
नाशपाती खा
पिकलेले नाशपाती फायबरचा चांगला स्रोत आहेत आणि सामान्यतः मूत्राशयाला तुलनेने सौम्य त्रासदायक मानले जातात. त्यांचे सेवन सकाळच्या मध्यात किंवा दुपारच्या जेवणाच्या सुमारास केले जाऊ शकते. मधुमेहींनी आपल्या सेवनाच्या प्रमाणाबद्दल जागरूक असले पाहिजे. आयसीए (ICA) आणि अमेरिकन युरोलॉजिकल असोसिएशन (AUA) यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संत्री, द्राक्षे व लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे मूत्राशयाच्या भिंतींना त्रास देतात, ज्यामुळे मूत्राशय वारंवार आकुंचन पावते आणि रात्री वारंवार लघवीला जावे लागते. नाशपाती हे अधिकृतपणे मूत्राशयासाठी अनुकूल फळ मानले जाते.
ब्लूबेरी खा
ब्लूबेरीमध्ये पॉलीफेनॉल आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यांचे सेवन दिवसभरात माफक प्रमाणात केले जाऊ शकते. तथापि, नॉक्चुरियावर उपचार म्हणून नव्हे, तर संतुलित आहाराचा एक भाग म्हणून ब्लूबेरीचा विचार करणे उत्तम ठरेल.
पपई हे सर्वोत्तम फळ आहे
पपई हे फायबरने समृद्ध असलेले फळ असून, त्यात पचनाशी संबंधित एंझाइम्स असतात. त्याचे सेवन दुपारच्या वेळी किंवा सायंकाळच्या सुरुवातीला केले जाऊ शकते. माफक प्रमाणात पपई हे फळ बहुतेक लोकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
टरबूज
टरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला रात्री वारंवार लघवीला उठावे लागत असेल, तर संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी ते खाणे टाळावे. तसेच दिवसा ते मर्यादित प्रमाणात खाल्ले जाऊ शकते. काही लोकांमध्ये रात्री टरबूज खाल्ल्याने शरीरातील एकूण द्रवपदार्थांचे प्रमाण वाढू शकते आणि रात्री लघवीला उठावे लागण्याचे प्रमाण वाढू शकते.
ॲपल
सफरचंद हे फायबरयुक्त फळ असून, ते सहसा पचायला सोपे असते. दिवसा त्याचा आनंद घेता येतो. मधुमेह किंवा रक्तातील साखरेची समस्या असलेल्या व्यक्तींनी खाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावे. दही आणि सुकामेवा यांसारख्या प्रथिने किंवा चरबीयुक्त पदार्थांसोबत सफरचंद खाल्ल्याने जेवणामुळे ग्लुकोजची पातळी कमी होण्याच्या परिणामांना संतुलित करण्यास मदत मिळू शकते
कोणती फळे आणि पदार्थ कमी केले पाहिजेत?
संत्री, द्राक्षे व लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे मूत्राशयाच्या संवेदनशीलतेमुळे काही लोकांमध्ये मूत्राशयाचा दाह वाढवू शकतात. तथापि, हे प्रत्येकाच्या बाबतीत खरे असेलच, असे नाही. क्रॅनबेरीचा रस अनेकदा मूत्रमार्गाच्या आरोग्याशी जोडला जातो; परंतु तो आम्लधर्मी असल्यामुळे काही लोकांमध्ये मूत्राशयाच्या त्रासाची लक्षणे वाढवू शकतो. त्याचप्रमाणे संध्याकाळी टरबुजासारखी फळे भरपूर पाण्यासोबत खाणे टाळणे उत्तम.
फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?
मूत्राशयाची संवेदनशीलता, एकूण द्रवपदार्थांचे सेवन आणि रक्तातील साखर यांनुसार फळांची निवड करावी. लिंबूवर्गीय किंवा आम्लयुक्त पदार्थांमुळे काही लोकांमध्ये मूत्राशयाची जळजळ आणि लघवीला जाण्याची भावना तीव्र होण्याचे प्रमाण वाढू शकते. मधुमेही व्यक्तींमध्ये, जास्त साखर असलेले पदार्थ रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवू शकतात, ज्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. जर तुम्हाला रात्री वारंवार लघवीला जावे लागत असेल, तर सकाळी, सकाळच्या मधल्या वेळेत किंवा दुपारी फळे खाणे अधिक चांगले ठरू शकते. विशेषतः, झोपण्यापूर्वी जास्त पाणी असलेली फळे खाणे टाळा. रात्री गरजेपेक्षा जास्त द्रवपदार्थ घेणे टाळा. फळे आरोग्यासाठी चांगली असतात; पण ती मोठ्या प्रमाणात खाणे आवश्यक नाही. साधारणपणे, फळाचा एक लहान तुकडा किंवा थोड्या प्रमाणात चिरलेली फळे पुरेशी असतात. मधुमेहींनी त्यांच्या एकूण कर्बोदकांचे सेवन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण यांनुसार आपला आहाराचे त्याच्या वेळेसह समायोजन केले पाहिजे.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर तुम्हाला रात्री दोन किंवा अधिक वेळा लघवीसाठी सतत जाग येत असेल, ही समस्या नवीन असेल, किंवा त्यासोबत जास्त तहान लागणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, लघवीतून रक्त येणे, पायांना सूज येणे, लघवीचा प्रवाह कमकुवत असणे किंवा अचानक लघवी येणे यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर तुम्ही डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. नॉक्चुरिया (रात्री वारंवार लघवीला जाणे) मधुमेह, पुरुषस्थ ग्रंथी (प्रोस्टेट)च्या समस्या, अतिसक्रिय मूत्राशय किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे असू शकतो.
