एकेकाळी मोबाईल जगतात अधिराज्य गाजवणाऱ्या नोकियानं यावर्षीच्या सुरूवातीला बाजारपेठेत दमदार पुनरागमन केले होते. यावर्षीच्या सुरुवातीला बाजारपेठेत दमदार पुनरागमन केलं. अँड्राईड फोन्सच्या आगमनानंतर नोकिया स्पर्धेत काहीशी मागे पडली होती. पण यावर्षात नोकियानं ‘नोकिया ३’, ‘नोकिया ५’, ‘नोकिया ६’ आणि ‘३३१०’ लाँच करून पुन्हा बाजारपेठेत जम बसवण्याचा प्रयत्न केला. नोकियाच्या प्रयत्नाला यशही येताना दिसत आहे. आता नोकिया आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये नोकिया आपला नवा स्मार्ट फोन लाँच करणार आहे.

या मॉडेलचे नाव ‘नोकिया २’ असण्याची शक्यता आहे. ‘नोकिया २’ हा ‘नोकिया ३’ पेक्षा खूप स्वस्त असेल असंही म्हटलं जात आहे. या फोनची किंमत साधरण सहा ते साडेसहा हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे. ४.७ ते ५ इंच डिस्प्ले, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोअरेज या फोनमध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असे फीचर्स फोनमध्ये असतील.