Chana Water Benefits: स्वयंपाकघरातील औषधी मसाल्यांपासून ते कडधान्य आणि भाज्यांपर्यंत आहारातील विविधता आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यातील एक महत्त्वपूर्ण कडधान्य म्हणजे काळे चणे, प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत म्हणून ओळखले जाणारे काळे चणे आरोग्यासाठी तर फायदेशीर असतातच; पण ते चवीलाही तितकेच चविष्ट असतात. काळ्या चण्याचे दोन प्रकार आहेत, ज्यातील एक म्हणजे देशी चणे आणि दुसरे काबुली चणे. देशी जातीचे चणे गडद रंगाचे आणि बाहेरून खडबडीत दिसतात. तर, ‘काबुली’ चणे बाहेरून गुळगुळीत आवरण असलेले मोठे आणि हलक्या रंगाचे असतात. चण्याची भाजी, आमटी किंवा अनेक जण फक्त भिजवलेले चणे खाणेदेखील पसंत करतात; परंतु चण्याचे पाणी पिणेदेखील आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे.
भिजवलेल्या चण्यांचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?
ते प्यायल्याने तुमच्या शरीराला चार प्रमुख फायदे मिळतील. चण्याचे पाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे मिळू शकतात.चणे डाळी, भाज्या, सॅलड, चाट आणि विविध प्रकारच्या स्नॅक्समध्ये वापरले जातात; पण तुम्ही कधी त्याचे पाणी प्यायला आहे का? केवळ चणेच नाही, तर त्याचे पाणीदेखील आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक फायदे देऊ शकतात.
ऊर्जा : चण्यांमध्ये प्रथिने, लोह आणि जटिल कर्बोदके असतात. त्यांचे पाणी प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साही वाटते. शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी हे पाणी पिऊ शकता.
पचन : चण्याच्या पाण्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पोट स्वच्छ होण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.
वजन : चण्याच्या पाण्यामुळे चयापचय क्रिया वेगवान होते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी होण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे एक नैसर्गिक डिटॉक्स पेय म्हणूनही काम करू शकते.
त्वचा : चण्याच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील अशुद्धी दूर करून त्वचा चमकदार बनवतात आणि मुरमे व डाग कमी करतात. या पाण्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा उत्तम आणि चमकदार राहते.
चणे खाण्याचे फायदे
- देशी काळ्या चण्यामध्ये उच्च फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. काळ्या चण्यामधील विद्राव्य फायबर पित्त अॅसिड नियंत्रणात ठेवते आणि शरीराद्वारे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. सुमारे ३/४ कप चणे दररोज आहारात समाविष्ट केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसेराइड्स कमी होण्यास मदत होते.
- काळ्या चण्यामधील कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. हे इन्सुलिन प्रतिरोधात योगदान देते, ज्यामुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो
- लोहाचा समृद्ध स्रोत म्हणून काळे चणे अशक्तपणाला प्रतिबंध करू शकतात आणि आपल्या ऊर्जेच्या पातळीला चालना देण्याची क्षमता त्यामध्ये असते. हे विशेषतः गर्भवती आणि स्तनपान करणार्या महिलांसाठी, तसेच वाढत्या मुलांसाठी फायदेशीर आहे. हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये लोह महत्त्वाची भूमिका बजावते, जे फुप्फुसांपासून शरीरातील सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते.
