scorecardresearch

आता Whatsapp वरून पेमेंट केल्यावर मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर

वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीने एक अतिशय खास ऑफर सादर केली आहे. ऑफर अंतर्गत, आता वापरकर्त्यांना पेमेंट केल्यावर कॅशबॅकचा लाभ मिळेल.

आता Whatsapp वरून पेमेंट केल्यावर मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर
कॅशबॅक ऑफर (फोटो: Indian Express)

व्हॉट्सअॅपने काही काळापूर्वी भारतीय बाजारपेठेत आपली यु पी आय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू केली. त्याच वेळी, आता कंपनीने ही सेवा अद्यतनित केली आहे आणि अद्यतनानंतर, ही सेवा बाजारात सध्या असलेल्या इतर यु पी आय आधारित अॅप्सला टक्कर देण्यास सक्षम असेल. भारतीय वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीने एक अतिशय खास ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत, आता वापरकर्त्यांना पेमेंट केल्यावर कॅशबॅक चा लाभ मिळेल. या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

अहवालानुसार, व्हॉट्सअॅपने आपल्या यु पी आय आधारित पेमेंट सेवेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी कॅशबॅकची एक उत्तम ऑफर सादर केली आहे. यामध्ये युजर्सना पैसे पाठवल्यावर कॅशबॅक मिळेल. जे पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या अॅप्सना स्पर्धा देऊ शकते. कारण सध्या या अॅप्समध्ये युजर्सना पैसे पाठवल्यावर कॅशबॅक मिळतो. तर आता ही सुविधा व्हॉट्सअॅप पेमेंट सेवेमध्येही उपलब्ध होणार आहे.

( हे ही वाचा: आज १ नोव्हेंबरपासून एलपीजी बुकिंग, ट्रेनच्या वेळापत्रकासह अन्य गोष्टींच्या नियमामध्ये होणार बदल)

कसा मिळणार कॅशबॅक

व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यांना चॅट लिस्टमध्ये Give cash, get ₹ 51 back चे बॅनर दाखवले जात असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप पे मध्ये पेमेंट केल्यावर तुम्हाला कॅशबॅक मिळेल असे या बॅनरवर लिहिले आहे. वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप पेवर पाच वेळा कॅशबॅकची सुविधा मिळेल आणि ५१ रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. म्हणजेच युजर्सना ५ वेळा २५५ रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या