Home Remedies Give Instant Relief From Constipation: सध्या अनेकजण बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करत आहेत. वाढती जीवनशैली, खाण्या- पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सतत जंक फूड्सचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढताना दिसतेय, विशेषत: तरुण वयातच या समस्येचा सामना करावा लागत आहे. याच आजारावर अभिनेत्री करिना कपूरची न्यूट्रिशनिस्ट असलेल्या मराठमोळ्या ऋजुता दिवेकर यांनी तीन सोपे उपाय सांगितले आहे.
ऋजुता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी आहारात करावयाचे ३ बदल सांगितले आहेत. यात काय करायचे आणि कोणता पदार्थ कसा खावा हे अत्यंत सोपे करून सांगितले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करु शकता.




बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
१) दुपारी जेवल्यानंतर लगेच गूळ अन् तूपाचे करा सेवन
दुपारी जेवल्यानंतर तुम्ही लगेच बारीक किसलेला गूळ आणि त्यात चमचाभर तूप मिक्स करु खावे, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यात मदत होईल असे ऋजुता यांनी सांगितले आहे.
गूळाच्या सेवनाने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते आणि तूप हा इसेन्शियल फॅट्स मिळण्याचा एक चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे गुळ आणि तूपाचे मिश्रण तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देऊ शकते. या दोन्ही पदार्थ्यांचे एकत्र सेवन केल्यस पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते अशी माहिती न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिली आहे.
२) कोणत्याही प्रकारचे मेलन फळ
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. अशा परिस्थितीत तुम्ही मेलन फळं अर्थात कलिंगड, टरबूज यांसारख्या फळांचे सेवन केले पाहिजे. कारण ही फळं शरीराचे हायड्रेशन अधिक चांगले ठेवण्यास मदत करते. तसेच यामुळे शरीराला योग्य पोषक तत्व मिळतात, ज्यामुळे Constipation Problem चा त्रास होत नाही. यामुळे दुपारी चहाच्या वेळी म्हणजे ३ ते ४ च्या दरम्यान तुम्ही या फळांचे सेवन केले पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल, अशी माहितीही ऋजुता दिवेकर यांनी दिली आहे.
3) तीळ लावलेली चपाती किंवा भाकरी
पांढऱ्या तीळामध्ये शरीरास आवश्यक अनेक पोषक तत्वे असतात. यात फायबरचे प्रमाणही अधिक असते ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यामुळे रात्रीच्या जेवणात तुम्ही तीळ मिक्स केलेली चपाती किंवा भाकरीचे सेवन करावे.
याशिवाय तीळामध्ये व्हिटामिन ई, फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे नाचणी, ज्वारीच्या भाकरीमध्येही तुम्ही १ चमचा तीळ मिक्स करुन खाल्लास त्याचा फायदा मिळू शकतो.