सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने दिल्या दिवाळीतील खानपानाविषयी महत्त्वपूर्ण टिप्स; जाणून घ्या

तुम्ही जर बाहेर जेवायला जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक केळी आणि दही खा.

lifestyle
दिवाळीच्या निमित्ताने चॉकलेट, कुकीज किंवा झटपट मिठाई खाण्यापेक्षा डेजर्ट खाणे चांगले. (photo: indian express)

दिवाळीच्या सणामध्ये खाण्यापिण्याबाबत लोकांमध्ये अनेकदा द्विधा मनस्थिती असते. लोकांना वाटते की त्यांनी मिठाई आणि पदार्थ खाल्ल्यास त्यांची पचनक्रिया बिघडते. त्यामुळे लोकांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे, ते खासकरून दिवाळीच्या दिवशी काहीही खाणे टाळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दिव्यांच्या या सणाला रात्री उशिरा जेवणाचा प्लॅन करत असाल तर सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी काही फूड टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्ही अवलंबू शकता.

केळी किंवा दही

तुम्ही जर बाहेर जेवायला जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक केळी आणि दही खा. कारण हे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिकचे उत्तम मिश्रण आहे. लोकं सहसा रात्रीच्या जेवणानंतर पेय घेतात, त्यामुळे दही आणि केळी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

गोड खाण्याऐवजी डेजर्ट खा

पोषणतज्ञ रुजुता दिवेकर सांगतात की, दिवाळीच्या निमित्ताने चॉकलेट, कुकीज किंवा झटपट मिठाई खाण्यापेक्षा डेजर्ट खाणे चांगले. कारण डेजर्ट रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

भाऊबीजनिमित्त ‘या’ विविध प्रकारच्या मेहंदी डिझाईनने तुमचे हात बनवा सुंदर!

हुशारीने अन्न निवडा

रुजुता दिवेकर यांनी यावेळी सांगतात की, तुम्ही जर रात्री उशिरा जेवत असाल तर फक्त एक किंवा दोन स्टार्टर्स निवडा. कारण रात्री जास्त गोष्टी खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम तर होतोच पण आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

याच बरोबर करीना कपूरचे न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करून घरी परतत असाल तर येताच तुमच्या पायाला तुपाने मसाज करा. कारण तुपाने मसाज केल्याने गॅस आणि पोटफुगीचा त्रास होत नाही आणि रात्री चांगली झोप लागते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्री एक ग्लास कोमट पाणी देखील पिऊ शकता.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोकं त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तर रुजुता या इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतात आणि त्या त्यांच्या पोस्टद्वारे लोकांना खाण्याबद्दल अलर्ट करत असतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nutritionist rujuta diwekar told some food and drink tips related to diwali scsm

ताज्या बातम्या