डायबेटिक पेशंट्ससाठी भेंडी ठरते ‘सुपरफूड’! जाणून घ्या ‘हे’ फायदे

संशोधनात असं आढळून आलं आहे की, भेंडी ही डायबेटिसच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

okra-superfood-for-diabetic-patients-know-these-benefits-gst-97
भेंडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील तणावाची पातळी कमी करतात. (Photo : प्रातिनिधिक)

भेंडी ही हिरव्या फुलांची वनस्पती आहे. तुम्हाला अस्श्चर्य वाटेल पण जास्वंद आणि कापूस यांसारख्या वनस्पतींच्या कुटुंबातील आहे. अनेकांना ही भाजी आवडते. मात्र, या भाजीची चव तर अप्रतिम आहेच. पण त्यासोबतच यात आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक घटकांचं आणि खनिजांचं प्रमाणही मुबलक आहे. मुख्य म्हणजे डायबेटीस आणि कॅन्सर पेशंट्ससाठी भेंडी ही ‘सुपरफूड’ मानली जाते. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फॉलिक अ‍ॅसिड आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं. तर कॅलरीजचं प्रमाण कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. दरम्यान, आज आपण भेंडीच्या या भाजीचे डायबेटिक पेशंट्सना असलेले फायदे जाणून घेणार आहोत.

डायबेटिक पेशंट्ससाठी अत्यंत फायदेशीर

संशोधनात असं आढळून आलं आहे की, भेंडी ही डायबेटिसच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी खूप फायदेशीर आहे. यावेळी ज्या लोकांनी भेंडीच्या पाण्याचं सेवन केलं त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याची नोंद झाली. इतकंच नव्हे तर तुर्कीमध्ये वर्षानुवर्षे डायबेटिसवर उपचार करण्यासाठी भाजलेल्या भेंडीच्या बिया औषध म्हणून वापरल्या जातात.

फायबरचं मुबलक प्रमाण

भेंडीमध्ये फायबरचं प्रमाण मुबलक असतं. त्यामुळे डायबेटीसवरच्या उपचारात ही भाजी महत्वाची भूमिका बजावते. हाय फायबर असलेले पदार्थ आपल्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतात. भेंडी देखील त्याचपैकी एक आहे. म्हणूनच तिला अँटी-डायबेटीस पदार्थांमध्ये गणलं जातं. त्याचसोबत भेंडी ग्लायसेमिक नियंत्रणास प्रोत्साहन देतं आणि इंसुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतं. ही भाजी फक्त डायबेटिक नियंत्रणात ठेवण्यासाठीच फायदेशीर नसते तर अपचन किंवा क्रेविंग कमी करण्यासोबतच तिचे इतरही अनेक फायदे आहेत.

तणावाची आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत

भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील तणावाची पातळी कमी करतात. डायबेटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त आहारातील बदल पुरेसे नाहीत तर आपल्या जीवनशैलीतील बदलांचा देखील त्यात समावेश होतो. कारण दीर्घकालीन तणावामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. हीच तणावाची पातळी कमी करण्याचं काम भेंडी करते.

तर संशोधनात असं आढळून आलं आहे की, डायबेटीस असलेल्या लोकांना हाय कोलेस्टेरॉल असण्याची शक्यता असते. म्हणूनच, शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर समृध्द अन्नपदार्थांचं सेवन करणं उत्तम ठरतं. त्यामुळे आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश असणं अत्यंत फायदेशीर ठरेल.

आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात भेंडीची भाजी बनतेच. त्याचसोबत, भेंडीचं पाणी देखील घेऊ शकतात. भेंडीचे तुकडे रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी तुम्ही ते पाणी पिऊ शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Okra superfood for diabetic patients know these benefits gst

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या