देशात ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. ओला देखील या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी सज्ज आहे. ओला स्कूटरची विक्री काल बुधवारपासून सुरू झाली होती, काल खास सेलही होता. परंतु वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ओला इलेक्ट्रिकने आगामी १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर एस १ ची विक्री थांबवली आहे. ओलाचे अध्यक्ष आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.बुधवारी त्यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले की ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीला एक आठवडा उशीर होईल. आता विक्री १५ सप्टेंबरपासून सुरू होईल. त्यांनी लिहिले की आम्ही आजपासून (बुधवार,८ सप्टेंबर) ओला एस १ आणि एस १ प्रो स्कूटर विकण्याचे वचन दिले होते पण आम्ही तसे करू शकलो नाही ज्यांनी अनेक तास वाट पाहिली त्या सर्वांची मी माफी मागतो.

कंपनीने दोन व्हेरिएंट लाँच केले होते

ओलाने गेल्या ऑगस्टमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन प्रकार बाजारात आणले. यामध्ये S1 ची किंमत ९९,९९९ रुपये आणि S1 Pro ची किंमत १,२९,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तथापि, राज्यांनुसार किंमतीत थोडासा बदल होऊ शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ८ सप्टेंबरपासून ही स्कूटर विकली जाणार होती, ज्याची डिलिव्हरी ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.

भावीश अग्रवाल यांनी ट्विट करून मागितली माफी

भावीश अग्रवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की मला माहित आहे की आम्ही तुम्हाला निराश केले आहे, मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. गुणवत्तेच्या दृष्टीने वेबसाइट आमच्या अपेक्षांनुसार नव्हती. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री पूर्णपणे डिजीटल केली आहे. यामध्ये कर्ज प्रक्रिया देखील पूर्णपणे डिजिटल आहे ज्यात कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. आता ग्राहकांना यासाठी आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.

प्रक्षेपणापूर्वी एक लाख बुकिंग झाली

ओला इलेक्ट्रिकने जुलैमध्ये ४९९ रुपयांमध्ये ओलासाठी प्री-बुकिंग सुरू केली. कंपनीला अवघ्या २४ तासांत १ लाखांहून अधिक ऑर्डर मिळाल्या. कंपनीने १५ ऑगस्ट रोजी औपचारिकपणे आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस १ लाँच केली.

अनेकांनी भावीश अग्रवाल यांना सपोर्ट केला आहे.