ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे दिवाळीपूर्वी होणार नाही वितरण, तर टेस्ट ड्राइव पुढच्या महिन्यापासून सुरु

ग्राहकांच्या नाराजीनंतर कंपनीने अंतिम पेमेंटही काही काळासाठी पुढे ढकलले आहे. आता १ नोव्हेंबरपासून बुकिंगचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

OLA Electric Scooter
ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर ( फोटो: ola website )

ओलाच्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणास होणारा विलंब निश्चित करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर देण्यास सक्षम राहणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ग्राहकांच्या नाराजीनंतर कंपनीने अंतिम पेमेंटही काही काळासाठी पुढे ढकलले आहे. यासोबतच ओला ई-स्कूटरच्या टेस्ट ड्राइव्हच्या तारखाही देण्यात आल्या आहेत.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट ड्राइव

ओला इलेक्ट्रिक या आठवड्यापासून डिलिव्हरी आणि अंतिम पेमेंट सुरू करणार होती. मात्र, टेस्ट ड्राईव्ह आणि डिलिव्हरीबाबत गोंधळामुळे ग्राहक कंपनीवर टीका करत होते. यानंतर, कंपनीने परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी एक निवेदन जारी केले. ओला इलेक्ट्रिकने सांगितले की आता त्याचे ग्राहक १० नोव्हेंबरपासून एस १ आणि एस १ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट ड्राइव घेऊ शकतात.

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीच्या लोकांना कधीही नसते पैशाची कमतरता; स्पर्धेत नेहमी राहतात पुढे )

बुकिंगचा दुसरा टप्पा लवकरच सुरू

कंपनीने १५ ऑगस्ट रोजी एस १ आणि एस १ प्रो इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली होती. एस १ मॉडेलची किंमत एक लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर एस १ प्रो ची किंमत १.30 लाख रुपये आहे. ओला इलेक्ट्रिकने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरसाठी १५ सप्टेंबरपासून दोन दिवस बुकिंग करण्याचा पर्याय दिला होता. ग्राहक हे ४९९ रुपयांमध्ये बुक करू शकतात. कंपनीने दावा केला होता की त्याला फक्त दोन दिवसात १,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहे. आता १ नोव्हेंबरपासून बुकिंगचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

( हे ही वाचा: TTD online booking: तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या मोफत दर्शनासाठी ‘असे’ करा बुकिंग )

अंतिम पेमेंटनंतर वितरण होणार

कंपनीने अगोदर म्हटले होते की ओला इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. कंपनी १८ ऑक्टोबरपासून ग्राहकांकडून अंतिम पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात करणार होती. आता कंपनीने स्पष्ट केले आहे की ज्या ग्राहकाला अंतिम पेमेंटची विंडो देण्यात आली आहे, त्याला त्याच पेमेंटमध्ये अंतिम पेमेंट करावे लागेल. त्यानंतर वितरण सुरू होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Olas electric scooter will not be delivered before diwali while the test drive will start from next month ttg

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या