Old age depression and benefits of fruits : ‘दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा’, अशी जुनी इंग्रजी म्हण आहे. आता ही म्हण फक्त डॉक्टरांना नाही तर मानसोपचारतज्ज्ञांनाही लागू होऊ शकते. सिंगापूर येथील नॅशनल युनिव्हर्सिटीच्या लू लिन स्कूल ऑफ मेडिसीनच्या एका अभ्यासात मानसिक आरोग्यासाठी आहार किती महत्त्वाचा आहे, याविषयी सांगितले आहे. चांगली पोषक तत्वे असलेली फळे नैराश्य कसे दूर करतात, याविषयी या अभ्यासातून माहिती सांगितली आहे. (Old age depression and benefits of fruits an apple orange and banana are good for mental health read how fruits can reduce depression in old-age)

वृद्धापकाळातील नैराश्य (Old age depression)

एक वेळ अशी येते की माणसाच्या मेंदूचे न्यूरोडीजनरेशन होते, यामुळे नैराश्याची अनेक लक्षणे दिसून येतात. जसे की निराशाजनक वाटणे, छंदामध्ये कमी ऋची होणे, कोणत्याही गोष्टीमध्ये उशीर होणे, थकवा जाणवणे. याशिवाय वृद्धापकाळात अनेक आजारांचा सामना करावा लागतो; अशात ही नैराश्याची लक्षणे खूप ठळकपणे दिसून येतात

हेही वाचा : Fever & Weight Loss : ताप आल्यावर वजन का होते कमी? वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पर्याय उत्तम ठरेल का? वाचा तज्ज्ञांचे मत

आजार, काम करण्याची मर्यादा, संधिवात, सीओपीडी, अंगदुखी, झोपेच्या समस्या यांसारख्या अनेक गोष्टींचा वृद्धत्वात सामना करावा लागतो. जेव्हा नैराश्याची लक्षणेदेखील या आजारांबरोबर दिसतात, तेव्हा शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याच्यासुद्धा समस्या वाढतात. विशेष म्हणजे नैराश्य ही खूप मोठी मानसिक समस्या आहे, ज्यामुळे माणसाला सामान्य जीवन जगतानासुद्धा अनेक अडथळे येतात.

फळांचे फायदे ( Benefits of fruits)

सफरचंद, संत्री आणि केळी यांसारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक तत्वे असतात. फळांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत होते आणि व्यक्तीचे नैराश्य दूर होते.

हेही वाचा : Yoga During Pregnancy : गरोदरपणात शारीरिक थकवा व अस्वस्थता जाणवते? करा सुप्त बध्दकोनासन, पाहा Viral Video

जर तुम्ही नियमित फळांचे सेवन केले तर वृद्धापकाळात नैराश्याची लक्षणे कमी दिसू शकतात. तसेच अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, दररोज कमीत कमी तीन फळांचे सेवन केल्याने नैराश्याचा धोका २१ टक्क्यांपेक्षा कमी होतो.