‘ऑलिव्ह ऑइल’मध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट घटकामुळे मेंदूच्या कर्करोगाशी लढा देण्यात मदत होऊ शकते, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. या घटकामुळे मेंदूत गाठ तयार होण्यास आळा बसू शकतो. ‘ऑलिव्ह ऑइल’मधील मुख्य घटक असलेल्या ‘ओलेईक अ‍ॅसिड’मुळे कर्करोग उद्भवणाऱ्या जनुकांना पेशीमध्ये कार्यरत होण्यापासून प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते. हा तेलकट पदार्थ चरबीयुक्त आम्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोषकांच्या गटामध्ये मोडतो. हा घटक कर्करोगाची निर्मिती करणाऱ्या प्रथिनांशी लढा देणाऱ्या पेशी रेणूंच्या निर्मितीला उत्तेजन देण्याचे कार्य करतो, असे संशोधकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ऑलिव्ह ऑइल’चा आहारात समावेश केल्याने मेंदूच्या कर्करोगाला प्रतिबंध होण्यास मदत होऊ शकते असे आम्ही अदय़ाप सांगू शकत नाही, पण प्रयोगशाळेत वाढवलेल्या, कर्करोगाशी लढा देणाऱ्या पेशींच्या निर्मितीस ‘ओलेईक अ‍ॅसिड’मुळे चालना मिळत असल्याचे आमच्या संशोधनात आढळून आले आहे. असे ब्रिटनमधील एडिनबर्ग विदय़ापीठातील ग्रॅकन मिक्लेव्स्की यांनी सांगितले. संशोधकांनी ‘मीआर-७’ नावाच्या पेशी रेणूंवर ‘ओलेईक अ‍ॅसिड’मुळे होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण केले. हे पेशी रेणू मेंदूमध्ये कार्यरत असून मेंदूमधील गाठ निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्याचे काम करतात. ओलई अ‍ॅसिड ‘एमएसआय-२’ या पेशी प्रथिनांच्या निर्मितीला आळा घालतात. ‘एमएसआय-२’ या पेशी प्रथिने कर्करोगाशी लढा देणाऱ्या ‘मीआर-७’ या पेशी रेणू तयार होऊ देत नाही. हे संशोधन ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olive oil helped to prevent cancer
First published on: 05-06-2017 at 04:23 IST